नाशिक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बबनराव घोलप यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. घोलप यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद ठाकरे गटाकडून काढून घेण्यात आले होते. तेव्हापासून ते ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी याआधीही आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांचा हा राजीनामा नाकारण्यात आला होता. यावेळी त्यांनी संजय राऊतांची भेट घेत आपली बाजू मांडली होती. भाजपचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना ठाकरे गटात प्रवेश देण्यात आल्यानंतर बबनराव घोलप नाराज होते. बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण आता ही जागा भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळू शकते, त्यामुळे बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला आहे.
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बबनराव घोलप अनुपस्थितीत
गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान अधिवेशनात बबनराव घोलप अनुपस्थित असल्याची माहिती आहे. नाराज असलेले घोलप येत्या दोन दिवसात शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
बबनराव घोलप यांचा राजकीय प्रवास
- महिला व बालकल्याण, ही महत्वाची खाती तसेच समाजकल्याण व माजी सैनिकांचे कल्याण अशा खात्यांचा मंत्री म्हणून काम
- चीन या देशाच्या बीजिंग येथे अर्थसंकल्प मांडणारे जगातील पहिले मंत्री
- खत्री आयोगाची स्थापना, भटक्या जमातीची अ, ब, क, ड अशी विभागणी करून त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून दिले.
- छोट्या – मोठ्या २०० संघटना विसर्जित करून महाराष्ट्रीय चर्मकार संघाची स्थापना
- पुढे देशपातळीवर राष्ट्रीय चर्मकार महासंघाची स्थापना
- निलांबरी, शेगावीचा राणा गजानन, मेरी मर्जी, सत्य साईबाबा या चित्रपटाची निर्मिती
- सेच निलांबरी, अष्टभुजा सप्तशृंगी माता, शेगावीचा राणा गजानन, अत्तराचा फाया, जय वैभव लक्ष्मी माता, वंशवेल, घरंदाज, श्री सत्य साईबाबा, नागराज तुझा भाऊ राया, बाप माणूस, संसार माझा सोन्याचा, विडा एक संघर्ष, शाहू महाराज मालिका अशा अनेक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारल्या.