ताज्या बातम्या महाराष्ट्र

युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत 2 दिवस पोलीस कोठडीत, मोदींच्या पोस्टरवर काळं फासल्याचा आरोप

नागपूर युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळं फासल्या प्रकरणी राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरवर काळ फासल्याप्रकरणी रविवारी नागपूर पोलिसांनी राऊतांना अटक केली होती. आज सोमवारी सत्र न्यायालयाने कुणाल राऊतांना दिलासा न देता दोन […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन अग्निपरीक्षेत यशस्वी; 47 आमदारांचा पाठिंबा, 27 विरोधात

रांची झारखंड विधानसभेत झालेल्या विश्वासदर्शक ठरावात मुख्यमंत्री चंपाई सोरेन सरकारने स्वत:ला सिद्ध केलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी विश्वासदर्शक ठरावावर घेतलेल्या मतदानात झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडीला 47 मतं मिळाली, तर प्रस्तावाच्या विरोधात 29 मतं पडली आहेत. चंपाई सोरेन यांच्या विश्वासदर्शक ठरावापूर्वी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विधानसभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, मी अश्रू ढाळणार नाही. झारखंडमध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी, भाजपच्या अडचणीत वाढ

मुंबई भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटातही यावरून संताप आहे. शिंदे गटाच्या ७ मंत्र्यांनी सोमवारी या प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे गणपत गायकवाड प्रकरण भाजपला […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये पंतप्रधान मोदींचं ‘अबँडन्स इन मिलेट्स’ अपयशी, झाकीर हुसेनच्या ‘पश्तो’चा गौरव

नवी दिल्ली जगभरातील कलावंत म्युझिक इंडस्ट्रीशी संबंधित या खास ग्रॅमी अवॉर्ड्सची आतुरतेने वाट पाहत असतात. ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये 94 विविध श्रेणीतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हॉलिवूडचे अनेक गायक आणि संगीतकारांना यात यश मिळालं असून भारतातील चार रत्नांनी देशाचा गौरव केला आहे. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘अबँडन्स इन मिलेट्स’ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

प्रक्षोभक भाषण प्रकरणात अटक केलेले इस्लामिक धर्मगुरू मौलाना अजहरी कोण आहेत?

मुंबई गुजरातच्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण देणारे मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात एटीएसने अटक केली आहे. मौलाना सलमान अजहरी यांना अटक केल्यानंतर पोलीस त्यांना घाटकोपरच्या पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यानंतर पोलीस ठाण्याच्या बाहेर मौलाना समर्थकांची मोठी गर्दी जमा झाली. पोलिसांनी आता पोलीस ठाण्याच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. मौलाना मुफ्ती सलमान अजहरी कोण आहेत आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यातील कंत्राटदारांना ‘राजकीय भाईगिरी’चा फटका, मारहाणीमुळे कामबंदचा इशारा, वडेट्टीवारांची राज्य सरकारवर टीका

मुंबई राज्य अभियंता संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांना एक आवाहन करणारं एक पत्र लिहिलं आहे. यात कंत्राटदारांना गावपातळीवर होणाऱ्या भाईगिरीच्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे. अनेक राजकीय मंडळी पैशांसाठी मारहाण करीत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रकार वाढण्याचं या पत्रकात दिलं आहे. यावर वेळीच कारवाई केली नाही तर फेब्रुवारी-मार्चमध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही व्यक्ती कोण? शोध घ्या, मग कळेल’; संजय राऊतांचा फोटोबॉम्ब

पुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुंड हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या गुन्ह्यात साक्षीदार आहे. हेमंत दाभेकर हा जामिनावर असून शरद मोहोळ याच्या अत्यंत जवळचा मानला जातो. दाभेकरने थेट वर्षा बंगल्यावर जाऊन खासदार श्रीकांत शिंदेची भेट घेतल्याने […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लडाखच्या रस्त्यांवर हजारोंची गर्दी; जनतेच्या आक्रोशामागील कारण काय?

लडाख केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. देशातील सर्वात शांत असणाऱ्या राज्यात नागरिक रस्त्यावर उतरल्याने अनेक जण हैराण आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यामागील काय आहे कारण? लडाखमधील नागरिकांचं म्हणणं आहे, केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा. 5 ऑगस्ट 2019 रोजी लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे करून केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलं होतं. लडाखमध्ये हजारो नागरिकांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सिंधुदुर्ग सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राणेही उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर

सिंधुदुर्ग भाजप नेते निलेश राणेंकडून उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर टीका केली जात होती, मात्र अशाही परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील गांधी चौकात उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी सभेत बोलताना ठाकरेंनी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटावर आगपाखड केली. या सभेत पंतप्रधान मोदीही त्यांच्या निशाण्यावर होते. सरकारकडून नुसता घोषणांना पाऊस पडत आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गणपत गायकवाडांच्या अडचणी वाढल्या, शेतकऱ्यांकडून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

ठाणे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढत असल्याचं चित्र आहे. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. आता गणपत गायकवाड यांच्याविरोधात उल्हासनगर-हिल लाईन पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणमधील द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस याप्रकरणी […]