ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महालक्ष्मी रेसकोर्सवर 100 कोटींचा घोड्यांचा तबेला बांधणार; घोडे श्रीमंतांचे, यासाठी जनतेचे पैसे का? ठाकरेंचा सवाल

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारला धारेवर धरलं. या पत्रकार परिषदेत कोस्टल रोडबरोबरच महालक्ष्मी रेसकोर्सचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कोस्टल रोडचं काम आमचं आहे, उद्धव ठाकरेंचं ते स्वप्न होतं. मात्र अद्याप ते काम पूर्ण झालेलं नाही तरीदेखील केवळ निवडणुकांसाठी उद्घाटनाचा घाट घातला जात आहे, अस घणाघात आदित्य […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नाना पटोले युतीच्या विरोधात आहेत का? पुंडकरांच्या व्हिडीओमुळे पुन्हा चर्चा

मुंबई महाविकास आघाडीचं ठरलं असं म्हणत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. या व्हिडीओत त्यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेत्यांची युती तोडण्याची भूमिका असल्यास आघाडी कशी होणार? असा सवाल धैर्यवर्धन पुंडकर यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीचा मसुदाच तयार झाला नाही तर पुढची बोलणी होणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कुणी म्हणतं फसवाफसवी, कुणी म्हणतं प्रत आलीच नाही; भुजबळांच्या राजीनाम्याच्या दाव्यामागची इनसाइट स्टोरी

मुंबई ओबीसी समाजाचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी १६ नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. मात्र या दाव्यावरून अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यात विरोधी पक्षांसह शिंदे गट आणि भाजपमधील नेत्यांचा समावेश आहे. जितेंद्र आव्हाड – छगन भुजबळांनी जर राजीनामा दिला आहे तर सरकारी गाडी, बंगला असं कसं […]

विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवार. रामटेक देवस्थान विधेयकावर चर्चा करताना विरोधकांनी राजकीय व्यक्तींना विश्वस्त न नेमण्याची मागणी केली. ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सरकारकडून नियम डावलून नियुक्त्या, प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे खच्चीकरण; वडेट्टीवारांचा घणाघात

मुंबई कमाल नागरी जमीन धारणा (युएलसी) घोटाळा प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) ने समन्स बजावल्याने ज्यांची चौकशी झाली, असे अधिकारी दिलीप ढोले यांची नुकतीच शासनाने सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती केली आहे. तर बृहन्मुबंई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. या नियुक्त्यांमुळे सरकारकडून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

कौटुंबिक शाखा घेण्याचा संघाचा मानस, आगामी प्रतिनिधी सभेत होणार विचारमंथन

नागपूर एका व्यक्तीसोबत त्याच्या कुटुंबालाही जोडून घेण्याचा प्रयत्न संघाकडून आगामी काळात केला जात आहे. दररोज शक्य नसेल तरी कुटुंबाची किमान साप्ताहिक शाखा घेण्याचा संघाचा मानस आहे. संपूर्ण कुटुंब एखाद्या विचाराशी जोडले गेले तर ते वैचारिक अधिष्ठान पुढच्या पिढीकडे देखील हस्तांतरित होत असल्याने संघाकडून नवं पाऊल उचललं जात आहे. संघाच्या प्रतिनिधी सभेत भविष्यातील योजनांवर विचारमंथन करण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गोळीबाराचा CCTV Video आला समोर, खुर्चीत शांतपणे बसले होते महेश गायकवाड, मात्र…;रात्री पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

मुंबई भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले. महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या शरीरातील सहा गोळ्या बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. दरम्यान हिललाईन पोलीस स्टेशनमधील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये एका खोलीत काही जणं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महेश गायकवाडांची प्रकृती गंभीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल

मुंबई भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले. महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या शरीरातील सहा गोळ्या बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. गायकवाड यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात पोहोचले आहेत. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यात शिंदे-फडणवीस-पवारांचे गुंडाराज, कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा, पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव; पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाडांनी भरदिवसा शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली आहे. भाजप आमदाराने महेश गायकवाड यांच्यावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून हे राज्याच्या गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचा आरोप केला जात आहे. ‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महेश गायकवाडांच्या शरीरातून 6 गोळ्या बाहेर काढल्या, प्रकृती अद्यापही गंभीर

मुंबई भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलिस स्थानकात तेही पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेचे केवळ राज्यभरातचं नाही तर देशभरात पडसाद उमटले आहे. अनेकांनी या वादामागे राजकीय कारण असल्याचाही आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि कल्याण शहरप्रमुख […]

मुंबई ताज्या बातम्या राष्ट्रीय

मोठी बातमी! लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न जाहीर, मोदींनी भेट घेऊन दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली भारताच्या राजकारणातले महत्वाचे राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आडवाणींनी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. अयोध्येतील रामजन्मभूमी आंदोलनाचं मोठं श्रेय लालकृष्ण आडवाणींना जातं. आडवाणींनी १९९० मध्ये गुजरातमधील सोमनाथ ते उत्तर प्रदेशातील अयोध्येपर्यंत रथयात्रा सुरू केली होती. 9 जून […]