ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेच्या कोणत्या 12 जागांवर दावा?

मुंबई वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे लोकसभा निवडणुकीसाठी 12 जागांची मागणी केली आहे. आता त्यांनी जागावाटपाबद्दल महाविकास आघाडीतील पक्षांना एक फॉर्म्युला दिला आहे. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी प्रत्येकी 12 जागा लढवाव्यात. उर्वरित 12 जागा वंचित लढवेल, असा फॉर्म्युला आंबेडकरांनी सुचवला. आंबेडकरांनी समसमान वाटपाचा लेटरबॉम्ब टाकला. त्यानंतर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचितला महाविकास आघाडीत घेण्यास नाना पटोलेंचा विरोध? ‘त्या’ व्हायरल मेसेजचं सत्य काय?

मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी भाजपकडून बैठका घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश करून घेण्याबाबत चर्चाच सुरू आहे. शरद पवारांनी भरसभेत खर्गेंना याबाबत विनंती केल्याचं म्हटलं असलं तरी अद्यापही खर्गेंनी वंचितला कोणताही निरोप पाठवला नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

व्हॉट्सअॅपवर कमेंट करून सोयाबीनचे भाव वाढणार नाही, तुपकरांनी केली कानउघडणी

मुंबई सोयाबीन-कापूस उत्पादनासारख्या शेतकऱ्यांच्या विविध विषयांसाठी लढणारे स्वाभिमानी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी शेतकरी बांधवांची कानउघडणी केली आहे. एकाच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, तर यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर कांदा कवडीमोल भावात विकला. दुसरीकडे दुधाचे दर वाढावे यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मात्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

गेल्या वर्षातील महाराष्ट्रातील सर्वात चर्चेतला चेहरा कोण?

मुंबई 2023 वर्षाच्या तब्बल सहा महिन्यांनी एक नाव समोर आलं आणि त्या चेहऱ्याने अख्खा महाराष्ट्र व्यापून घेतला. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं शस्त्र उगारणारे मनोज जरांगे पाटील हे 2023 चे हिरो ठरले असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. गेल्या चार महिन्यांपूर्वी कोणालाही फारसे माहीत नसलेले जरांगे पाटील 2024 च्या सुरुवातील अख्खा महाराष्ट्रभरात चर्चिले जात आहे. जाणून घेऊया […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

शरद पवार आणि उद्धव ठाकरे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार की नाही?

मुंबई 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोमात सुरू आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो लोक अयोध्येत एकत्र येणार आहेत. दरम्यान या सोहळ्याला उबाठा गटाचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निमंत्रण पाठवलं नसल्याचं सांगितलं जात आहे. यावरुन संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचे पॉलिटिकल इव्हेंट संपल्यानंतर अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘देशात ओबीसी किती हे कळलच पाहिजे’, आगामी निवडणुकीत राहुल गांधींचं जातीय जनगणनेंच कार्ड

नागपूर आज काँग्रेसच्या 139 वर्धापन दिनानिमित्ताने राहुल गांधीसह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नागपूरात उपस्थिती दर्शवली. यावेळी राहुल गांधींनी आपल्या भाषणात भाजपसह नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यावेळी म्हणाले, I.N.D.I.A आणि NDA यांच्यात विचारधारेचा लढा आहे. काही दिवसांपूर्वी मी लोकसभेतील एका भाजप खासदाराला भेटलो. ते मला म्हणाले, भाजपमध्ये गुलामगिरी आहे… वरून जे काही सांगितलं जातं, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

निधी संकलनाची अनोखी शक्कल, काँग्रेसच्या महारॅलीत खुर्च्यांना ‘क्यूआर-कोड’

नागपूर काँग्रेस पक्षाच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त (139th Foundation Day of Congress Party) नागपुरात “है तैय्यार हम” महारॅली आयोजित करण्यात आलीय. निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांकडून निधी संकलनाकरिता काँग्रेसने अनोखी शक्कल लढवली आहे. या रॅलीतील प्रत्येक खुर्चीच्या मागच्या बाजूला ‘क्यूआर-कोड’चे स्टीकर्स लावण्यात आले होते. उमरेड मार्गावरील सभास्थळी भव्य असे 3 स्टेज उभारण्यात आलेत. स्टेजवर 620 खुर्च्या ठेवण्यात आल्यात. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आजीचा आशीर्वाद अन् भाकरी-चटणीचं गाठोड, सर्व शब्दांच्या पलीकडले; अमोल कोल्हेंचा भारावून टाकणारा अनुभव

पुणे शेतकरी आक्रोश मोर्चानिमित्ताने खासदार अमोल कोल्हे सध्या गावागावांमध्ये फिरत आहेत. महाविकास आघाडीचा हा मोर्चा शिवनेरीपासून सुरू झाला आहे. कांदा निर्यात बंदी, दुधाचे कोसळलेले दर यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. शिरूरमध्ये जात असताना जातेगाव येथे एका वृद्ध आजीने खासदार अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्यावरुन हात फिरवला आणि भाकरीचा तुकडा-चटणी भरवलं त्यांचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, ‘वर्षा’वर कसली खलबतं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर हेदेखील उपस्थित होते. भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. वर्षभरात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘राम मंदिर कार्यक्रमाला बोलवलं नाही म्हणून थयथयाट’, राणेंचा राऊतांवर घणाघात

मुंबई संजय राऊत यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा भाजपाचा इव्हेंट आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच त्यात पावित्र्य कुठे आहे? असा सवाल उपस्थित केल्यानंतर भाजपकडून चित्रा वाघ आणि नितेश राणे यांनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे. राऊतांच्या या टीकेवर भाजपा महिला […]