ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य सरकारने जनतेची, शेतकऱ्यांची घोर निराशा केली; विरोधकांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध आंदोलन

नागपूर नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी विविध विषयांवरुन संताप व्यक्त केला. संसदेत खासदारांचे झालेले निलंबन, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा समाज, ओबीसी समाज… जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी रीबिन बांधून निषेध आंदोलन केले. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कोरोनाकाळात तारले होते. मात्र, विद्यमान सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका विधानसभेतील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘फुकट फुकट…’; कांद्याच्या 64 गोण्या फुकट विकणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा, अंगावर काटा आणणारा Video

मुंबई कांद्यावर निर्यातबंदी लावल्यानंतर आता राज्यातही कांद्याला भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हवीभाव मिळणंही कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यावर मोठं संकट आ वासून उभं आहे. शेतकऱ्यांची व्यथा सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. मविआतील अनेक नेत्यांनी शेतकऱ्याची व्यथा सांगणारा हा व्हिडीओ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विदर्भावर अन्याय करू नका, विदर्भातील प्रश्नांना उत्तरे द्या – नाना पटोले

नागपूर नागपूर करारानुसार विदर्भाच्या प्रश्नांसाठी हे अधिवेशन होत असते. सभागृहात विदर्भातील विषय मांडले पण सरकार त्याला उत्तर द्यायला तयार नाही. केवळ दीड आठवड्याचे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाचा कालावधी आणखी दोन दिवस वाढवावा अशी मागणी केली पण आता अंतिम आठवडा प्रस्ताव आला आहे. विदर्भावर अन्याय करुन जाऊ नका, विदर्भातील प्रश्नांना उत्तरे द्या, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भारतीय संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन; सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेही निलंबित

नवी दिल्ली संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सत्रात विरोधी पक्षाने घातलेला गोंधळ आणि आंदोलनामुळे आज मंगळवारी (19 डिसेंबर) 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. अशा प्रकारे आतापर्यंत 141 खासदार निलंबित करण्यात आले असून हे संसदेच्या इतिहासातील मोठी कारवाई मानली जात आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. लोकसभेत सुप्रिया सुळे, मनिष […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र शोध बातमी

मोठी बातमी! भ्रष्ट आणि निलंबित क्रीडा अधिकाऱ्यांना कोण वाचवतेय? 

जळगाव राज्याच्या क्रीडा विभागातील तीन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसह एका उपसंचालकांविरोधात भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कामे केल्याच्या आरोपावरून विभागांतर्गत चौकशी (departmental enquiry) सुरू आहे. मात्र ही चौकशी दाबण्यासाठी अधिकारी पातळीवरून प्रयत्न केले जात असून क्रीडामंत्री संजय बनसोडे (Sports Minister Sanjay Bansod) यांना याबाबत पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले आहे. ही चौकशी दाबण्यामागे कोणाचा हात आहे हे मंत्री शोधून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आंदोलनानंतर सभागृहात दूध प्रश्न केंद्रस्थानी; परंतू शेतकऱ्यांना थेट अनुदान कधी मिळणार?

नागपूर किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे दूधदराचा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे. आज सभागृहात दूध प्रश्नाबाबत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना हरिभाऊ बागडे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांनी अभ्यासपूर्ण प्रश्न विचारत दूधदर प्रश्नावर लक्ष वेधले. दूध अनुदान थेट शेतकऱ्यांना (When will farmers get direct subsidy for Milk) मिळावे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

इंडिया आघाडीचा चेहरा कोण? तुम्हाला संधी मिळाली तर… काय म्हणाले उद्धव ठाकरे?

नवी दिल्ली 2024 हे निवडणुकीचं वर्ष असणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार असल्याने उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. इंडिया आघाडीच्या बैठकीत निवडणुकीची रणनीती आखण्यात येणार आहे. ऑगस्टनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. त्यात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड निवडणुकीच्या निकालावरही या बैठकीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रविकांत तुपकर आक्रमक, शेतकऱ्यांच्या ताफ्यासह विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा

नागपूर सोयाबीन-कापसाला भाव मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विधानभवनावर मोर्चा पुकारला आहे. विधानभवनाच्या प्रवेश द्वारावर जवळ उभे राहून त्यांनी ताफ्यासह आत येण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तेथे पोलिसांकडून अडवण्यात आलं. सह्याद्रीवर पियुष गोयल यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण केलं नसल्याचा आरोप तुपकरांनी यावेळी केला. एकनाथ शिंदे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेत विरोधी पक्षांनी घातला गोंधळ, संपूर्ण अधिवेशनासाठी 31 खासदार निलंबित

नवी दिल्ली सोमवारी लोकसभेच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी 34 विरोधी खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आलं. निलंबित करण्यात (31 Lok Sabha MPs suspended for the entire session) आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, द्रमुक खासदार टीआर बालू, दयानिधी मारन आणि तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निलंबित करण्यात आलेल्या खासदारांपैकी 31 खासदारांना उर्वरित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Video : ‘अदानींसोबत सेटलमेंट झालेली दिसत नाहीये’, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई धारावीच्या पुनर्विकासाबाबत महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. धारावीच्या विकासावरून उद्धव ठाकरेंनी अदानींविरोधात मोर्चा काढत राज्य सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावर राज ठाकरेंनी वक्तव्य (Raj Thackeray attack on Uddhav Thackeray) केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, अदानींसोबत यांची सेटलमेंट झालेली नाही. आठ […]