ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

उद्योग, शेती, ऊर्जा क्षेत्राला बळकटी देत विदर्भाचा विकास साधणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

X : @therajkaran नागपूर विदर्भातील सुरजागड (Surajagad, Vidarbha) येथे १४ हजार कोटी आणि ५ हजार कोटी रुपयांचे दोन नवीन प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर या भागात १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला आणखी एक स्टील प्रकल्प गडचिरोली (Steel project in Gadchiroli) येथे आणला जाणार आहे. विदर्भासाठी २० हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment in […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सिलिंग कायद्यात सुधारणा करण्यास विधिमंडळाची मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  

X : @therajkaran नागपूर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिलिंग कायद्यात सुधारणा (amendment in ceiling act) करण्यास विधिमंडळाची मान्यता आज मिळाली आहे. आता खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग-2 म्हणुन वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटा वर्ग-1 करणे शक्य होणार आहे. यामुळे खंडकरी शेतकरी व सिलिंग जमीनी मिळालेल्या भूमीहीन, माजी सैनिक, दुर्बल घटकांना लाभ मिळणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करा : मंत्री मंगल प्रभात लोढा 

X : @NalavadeAnant नागपूर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना मंत्री मंगल प्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) यांनी आपण कोणतेही चुकीचे काम करत नसल्याचे सांगत, आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करण्याचे थेट आव्हान बुधवारी येथे दिले. अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी आज सभागृहात बोलताना पुराव्याशिवाय आरोप केल्यानंतर, काही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य सरकारने जनतेची, शेतकऱ्यांची घोर निराशा केली : विजय वड्डेटीवार 

X : @NalavadeAnant नागपूर नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या (Nagpur winter session) शेवटच्या दिवशी विरोधकांनी संसदेत खासदारांचे झालेले निलंबन, हिवाळी अधिवेशनात शेतकरी, मराठा समाज, ओबीसी समाज तसेच जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याने विरोधकांनी बुधवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी रीबिन बांधून निषेध आंदोलन केले. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कोरोना काळात (corona pandemic) तारले होते. मात्र, विद्यमान […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आ. प्रविण दरेकर यांचा सुषमा अंधारेंच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव?

X : @NalavadeAnant नागपूर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात केलेल्या आरोपावरून हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी सभागृहात भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर चांगलेच आक्रमक झाले. कोणतीही शहानिशा न करता उपसभापतींचा अवमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव (Breach of Privilege motion) दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी बुधवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तर गृहमंत्र्यांचा दरारा दिसायला हवा होता : जयंत पाटील

X : @NalavadeAnant नागपूर राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्या देखील मागे पडला आहे. उपराजधानी नागपुरातही तीच परिस्थिती आहे. त्यामूळे फडतूस नाही, काडतूस आहे म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांचाही दरारा नाही, अशा कठोर शब्दात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ आमदार जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी बुधवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘रामावर एवढं प्रेम असेल तर सीतामाईचं संरक्षण करा’, जयंत पाटलांचा हल्लाबोल

नागपूर आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी सभागृहात सरकारला धारेवर धरलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह जयंत पाटील यांनीही प्रश्नांची सरबत्ती केली. गेल्या काही दिवसात राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आपलं राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आली असून देशात भारतात पहिल्यांदाच राम अवतरत आहे की काय असं वातावरण आहे. रामावर एवढं प्रेम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार, ढासळलेली आरोग्य व्यवस्था; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काढले सरकारचे वाभाडे

नागपूर राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था, मोठया प्रमाणात भ्रष्टाचारात झालेली वाढ आणि ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थे प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचे वाभाडे काढले. सरकार जनतेच्या मुळावर व शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहे. शेतकऱ्यांना विमा अनुदानाव्यतिरिक्त एकही रुपयाची मदत जाहीर केली नाही. विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांना कोणतंही पॅकेज दिलं नाही. हे सरकार भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आरक्षणावरील मुख्यमंत्री शिंदेंचे विधानसभेतील भाषण भाजपा-RSS ने दिलेला ड्राफ्ट – नाना पटोले

नागपूर राज्यात सध्या ऐरणीवर असलेल्या विविध समाजाच्या आरक्षणावर जातनिहाय जनगणना हाय पर्याय आहे. काँग्रेस पक्षाने त्यासंदर्भातील आपली भूमिका सभागृहात मांडली आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. संघ व भारतीय जनता पक्षाला आरक्षणच संपवायचे आहे म्हणून महाराष्ट्रात वाद चिघवळला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आरक्षणप्रश्नी केलेले भाषण हे भाजपा व राष्ट्रीय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वारंवार पेपरफुटीच्या घटना आणि नोकर भरतीसाठी 1 हजार फी; विद्यार्थ्यांसाठी रोहित पवार आक्रमक

नागपूर आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काळ्या फिती बांधून आंदोलन केलं. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसदेत खासदारांचे झालेले निलंबन, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा समाज, ओबीसी समाज जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केले. याशिवाय आज शेवटचा दिवस असल्याने विरोधकांनी महत्त्वाचे विषय सभागृहात […]