ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपनं काढलं ‘धनगर’ कार्ड, बारामतीत पवारांना घेरण्याचा प्रयत्न, नवनाथ पडळकरांवर मोठी जबाबदारी

बारामती भाजपकडून शरद पवारांना बारामतीत घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा बदल केला आहे. भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा प्रभारी म्हणून नवनाथ पडळकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. गेल्या 31 वर्षांपासून बारामती मतदारसंघ पवार कुटुंब जिंकत आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही सुरक्षित सीट मानली जाते. शरद पवार येथून 6 वेळा, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Maratha Reservation : राज्याचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला, ‘सगेसोयरे’ शब्दावरुन मतभेद

जालना राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. राज्य सरकारच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह जालन्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा समावेश होता. मनोज जरांगे पाटील ‘सरसकट’ मराठा आरक्षणाची मागणी करीत होते. मात्र सरसकट आरक्षण मिळणे कठीण असल्याने ‘सरसकट’ या शब्दाला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचं पाककौशल्य; शेअर केला भन्नाट रेसिपीचा Video

मुंबई भाजप नेत्या पंकजा मुंडे कायम चर्चेत असतात. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही त्या व्यक्त होत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या घरातील देवघर दाखवलं होतं. त्यांच्या राजकीय कौशल्याबद्दल तर आपल्याला माहिती आहेच, मात्र एका व्हिडीओतून त्यांनी पाककलेतील कौशल्यही दाखवलं आहे. पंकजा मुंडे यांनी दालमखनीची रेसिपी शेअर केली आहे. त्यांना चांगला स्वयंपाक करता येतो, मात्र वेळेअभावी त्यांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त 96 वर्षीय ज्येष्ठ माजी सदस्य ॲड. गोविंदराव आठवले यांचा सत्कार 

नागपूर महाराष्ट्र विधानपरिषदेचे 96 वर्षीय सर्वात ज्येष्ठ माजी सदस्य ॲड. गोविंदराव आठवले यांचा दिनांक 20 डिसेंबर रोजी संध्याकाळी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र विधानपरिषदेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 8 नोव्हेंबर, 2023 आणि 8 डिसेंबर, 2023 रोजी अनुक्रमे मुंबई आणि नागपूर येथे जो समारंभ झाला, त्याला वयोमानामुळे माजी विधानपरिषद सदस्य ॲड. गोविंदराव आठवले, उपस्थित राहू शकले नव्हते. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘महाराष्ट्रात पुढे काय होईल, सांगता येत नाही; भाजपची स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी’, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

मुंबई राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत भाजपामध्ये कोण मुख्यमंत्री होईल हे सांगता येत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आव्हाडांनी एक सूचक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटवरुन सध्या जोरदार (Jitendra Awhad’s sensational claim) चर्चा सुरू झाली आहे. जितेंद्र आव्हाडांचं ट्विटनागपूरमधील […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

ED च्या चौकशीला अरविंद केजरीवालांची दांडी, विपश्यनेसाठी कालच रवाना; आता 10 दिवसांनी परतणार!

नवी दिल्ली आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश असताना ते आज उपस्थित राहू शकणार नसल्याचं समोर आलं आहे. ते कालच 10 दिवसांच्या विपश्यनेसाठी गेले आहेत. त्यांना मंगळवारीच (Arvind Kejriwal’s Absence to ED Inquiry, Left for Vipassana Yesterday) विपश्यनेसाठी जायचं होतं, मात्र इंडिया आघाडीची बैठक असल्याने त्यांनी हा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरणी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकावर कारवाईचे आदेश

X : @therajkaran नागपूर ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 18 रुग्णांच्या मृत्यू संबंधातील (Death in Kalwa hospital) अहवाल प्राप्त झाला आहे. घटना घडली तेव्हा सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापक त्याठिकाणी हजर असायला हवे होते; ते तिथे नव्हते. अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांना आदेश आजच्या आजच देण्यात येतील, असे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विदर्भातील विरोधी पक्षनेत्याला विदर्भाच्या प्रश्नांचा विसर पडला : देवेंद्र फडणवीस

X : @therajkaran नागपूर संपूर्ण हिवाळी अधिवेशनात विदर्भासाठी (Vidarbha) चर्चेचा एकही प्रस्ताव विरोधी पक्षांनी दिला नाही. अंतिम आठवडा प्रस्ताव हा विदर्भावरील चर्चेचा असायला हवा होता. इतिहासाचे दाखले तसेच आहेत. मात्र विरोधी पक्षाला विदर्भाचा विसर पडला, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत केला.  पोलीस विभागाचा नवा आकृतीबंध या सरकारने तयार केला असे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील एकही हिरे उद्योग सुरतला गेलेला नाही : देवेंद्र फडणवीस

X : @therajkaran नागपूर मुंबईतील एकही हिरेविषयक (Diamond business shifting to Gujarat) उद्योग गुजरातला गेलेला नाही. याऊलट देशातील सर्वात मोठा ‘जेम्स अँण्ड ज्वेलरी पार्क’ मुंबईत उभा राहतोय, सूरत डायमंड मार्केटमुळे (Surat Diamond market) येथील उद्योगावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.  ते म्हणाले, सूरतमधील हिरे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर यशोमती ठाकूर – गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक वाद

X : @therajkaran नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात मंत्री आणि कॉंग्रेस महिला सदस्य यांची जोरदार शाब्दिक चकमक उडाली.  महिलांना सन्मान देण्याची संस्कृती यांची नाही, असा आक्षेप महिला सदस्यांनी घेतला तर, आपण मंत्री असताना काय केले, वाटल्यास माझ्यावर हक्कभंग आणा, असे आव्हान मंत्री यांनी दिले. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. त्याच वेळी संतप्त […]