ताज्या बातम्या राष्ट्रीय

अखेर राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; चर्चेतली नावं पडली मागे, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

जयपूर मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाल्यानंतर आता राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनेकांची नावं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. मात्र त्या नावांच्या पलीकडे जात पक्षश्रेष्ठींनी भजन लाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. सांगानेरचे आमदार भजन लाल शर्मा यांना राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून घोषित (Sanganer MLA Bhajan Lal Sharma is the new […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

निरगुडे मागासवर्गीय आयोग असताना शिंदे आयोगाची गरजच काय? नाना पटोलेंचा सवाल

नागपूर नागपूरच्या हिवाळी अधिवेशानाकडे राज्यातील शेतकरी मोठी आशा लावून बसला आहे. वर्षभर सातत्याने नुकसानच होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी मानसिकतेमुळे दररोज 14 आत्महत्या होत आहेत. सरकार आजतरी शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करेल अशी अपेक्षा होती परंतु सरकारने आज चर्चेला उत्तर दिले नाही. मुख्यमंत्री शुक्रवारी निवेदन करतील असे सांगण्यात आले. मदतीची […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर तब्बल 9 कोटींचं कर्ज

भोपाळ मोहन यादव यांची मध्य प्रदेशच्या नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अखेर मध्य प्रदेशला त्यांचा नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. मात्र मोहन यादव राज्याच्या मुख्यमंत्रिपदी निवडून येतील याचा अंदाज क्वचितच कोणी बांधला असेल. आता लोक त्यांच्याबाबत जाणून घेत आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याबाबत एक वित्तीय बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांवर कोट्यवधींचं […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण, खासदार संजय राऊतांवर गुन्हा दाखल

यवतमाळ यवतमाळच्या उमरखेड पोलीस ठाण्यात भाजपाच्या नितीन भुतडांच्या तक्रारीनंतर अखेर खासदार संजय राऊतांवर गुन्हा दाखल (A case has been registered against MP Sanjay Raut) करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘सामना’ या वृत्तपत्रातून देशविरोधी व्यक्तव्य करून देशद्रोहाचा गुन्हा करित देशाचे पंतप्रधानांची बदनामी केल्याचा आरोप करित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेविरोधात अंबादास दानवे ऑक्सिजन मास्क घालून विधीमंडळात

नागपूर राज्यातील ढासळलेली व व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्यव्यवस्थेविरोधात आज मविआच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिकात्मक आंदोलन केले. जनतेचं आरोग्य खराब करणाऱ्या सरकारचे स्टेथोस्कोप घेऊन तपासणी करणार, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोग्य व्यवस्थेवरून सरकारला चिमटा काढला. गळ्यात स्टेथोस्कोप व तोंडाला ऑक्सिजन मास्कमंत्री खात तुपाशी, रुग्ण मरतायत उपाशी, रुग्णांना नाही औषध गोळी, आरोग्यव्यवस्थेची झाली होळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘प्रिय बाबा…’ शरद पवारांच्या वाढदिवशी सुप्रिया सुळेंचं भावुक करणारं पत्र, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

मुंबई महाराष्ट्राचे चाणक्य मानले जाणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहे. ’83 वर्षांचा तरुण योद्धा’ अशा शब्दात त्यांचा गौरव केला जात आहे. दरम्यान शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांची लेक सुप्रिया सुळे यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. https://www.facebook.com/share/p/aHAsYJ7sK9awrNbF/?mibextid=aubDjK सुप्रिया सुळेंची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य मागासवर्ग आयोग अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, सरकारने स्पष्टीकरणं द्यावं; विरोधी पक्ष नेते आक्रमक

मुंबई राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे निरगुंडे यांच्याकडून सरकारमधील दोन मंत्री आयोगाच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्य सरकारने निरगुडे यांचा राजीनामा स्वीकारलाही आहे. यावरुन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य एकामागून एक आपला […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

वसुंधरा राजे एक वर्षासाठी होणार राजस्थानच्या मुख्यमंत्री? जेपी नड्डांसोबतच्या संभाषणात काय ठरलं?

जयपूर राजस्थानात दोन वेळा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर विराजमान झालेल्या भाजप नेत्या वसुंधरा राजे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. इतर (Who will be next CM of Rajasthan) दावेदारांना मागे सोडत वसुंधरा राजे आता 1 वर्षासाठी मुख्यमंत्री होऊ शकतात. एबीपी न्यूजच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुंधरा राजे यांनी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना फोन करून एक वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कांदा निर्यात बंदीवरुन शरद पवार थेट मैदानात, चांदवडला राष्ट्रवादीचा रास्तारोको

नाशिक केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. आज पवारांच्या उपस्थितीत नाशिकमधील चांदवड येथे रस्तारोको आणि सभा घेण्यात आली. यंदा राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशात केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याला कवडीमोल […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरातून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय वैध की अवैध? आज सर्वोच्च न्यायालयात फैसला

नवी दिल्ली जम्मू-काश्मीरातून कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या निर्णयावर फैसला (removed Article 370 from Jammu and Kashmir valid or invalid? ) होणार आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेने जम्मू-काश्मीरातून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला होता. सोबतच राज्याला जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन भागात विभागणी केली होती आणि दोघांना […]