ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

काकींनी केला पुतण्याचा बचाव, दिशा सालियन प्रकरणात शर्मिला ठाकरेंचं मोठं विधान

मुंबई दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला जात असून यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या काकी आणि राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दोन वेगवेगळ्या राजकीय चुली मांडल्या आहेत. दोघंही एकमेकांवर तिखट शब्दात हल्ला करतात. काही दिवसांपूर्वी तर दोघेही एकत्र […]

विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवार. रामटेक देवस्थान विधेयकावर चर्चा करताना विरोधकांनी राजकीय व्यक्तींना विश्वस्त न नेमण्याची मागणी केली. ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका सत्ताधारी पक्षा इतकी महत्त्वाची – विजय वडेट्टीवार

नागपूर जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग आणि रंग असा कोणताही भेद न पाळता सार्वभौम, धर्मनिरपेक्ष भारत घडविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करावे, असे आवाहन करत स्वातंत्र्याला गुलाम बनवण्यासाठी दिवसागणिक अनेक शक्ती, लोक नव नवे षडयंत्र रचत असतात त्या षडयंत्रांना हाणून पाडून स्वातंत्र्याला जपणं हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन विधान सभेचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पोकरा योजनेतील भ्रष्टाचारात अधिकारी दोषी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा धक्कादायक आरोप

नागपूर शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या पोकरा योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असून एकाच योजनेतून दोनदा लाभ घेतला जातो. अकोला जिल्ह्यात या योजनेत झालेल्या भ्रष्टाचारात अधिकारीही दोषी असून यावर कारवाईची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. शेततळे, फळबाग, कृषी लागवड, तुषार व ठिबक सिंचन आदीसाठी शेतकऱ्यांना पोखरा योजनेच्या माध्यमातून लाभ होत असतो. अकोला जिल्ह्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नागपूरच्या हॉटेलात काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू

नागपूर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरच्या हॉटेल ली मेरिडीयन येथे काँग्रेस नेत्यांची बैठक सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. जानेवारीमध्ये राहुल गांधी यांची सभा होणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीवर सरकारी अधिकाऱ्यांची एवढी मेहरबानी का? नाना पटोलेंचा सवाल

नागपूर ठाणे जिल्ह्यातील मीरा भायंदर येथील ८९९४ एकर जमीन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २००८ रोजी इस्टेट इन्व्हेस्टमेंट या खाजगी कंपनीला बेकायदेशीरपणे हस्तांतरीत करण्यात आली असून या कंपनीचे ७/१२ उताऱ्यावर नावही आहे. येथील जमीन व्यवहार करताना जनतेला या कंपनीला पैसे द्यावे लागतात. सरकारी जमिनीवरून अशा पद्धतीने पैसे वसूल करण्याचा या कंपनीला अधिकार आहे का? याप्रकरणी सरकार चौकशी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

मुंबई विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या पुनर्गठनाची कार्यवाही त्वरित करण्याबाबत केंद्रसरकारला पत्राद्वारे यापूर्वीच विनंती करण्यात आलेली आहे. कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीसह राज्याच्या इतर प्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेण्यासाठी राज्याचे शिष्टमंडळ पुढील दोन दिवसात दिल्लीला जाणार आहे. त्यावेळी वैधानिक विकास मंडळाचे तातडीने पुनर्गठन करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोकणातील शेततळ्यांबाबत बैठक घेऊन निर्णय घेणार, प्रश्नोत्तराच्या तासात धनंजय मुंडेंची माहिती

नागपूर ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतील प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

पोलीस भरतीचं स्वप्न अपूर्ण, संसदेबाहेर घोषणाबाजी करणारा अमोल शिंदे कोण?

नवी दिल्ली संसदेवर बुधवारी चौघांनी केलेल्या हल्ल्यानंतर नागपूर पोलिसांनी हिवाळी अधिवेश सुरू असलेल्या विधानमंडळ परिसरात आणि बाहेरची सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. काल संसदेत हल्ला करणाऱ्यामध्ये महाराष्ट्रातील लातूरमधील अमोल शिंदे नावाच्या एका तरुणाचा समावेश आहे. संसदेची बातमी समोर आल्यानंतर अमोलच्या गावात खळबळ उडाली आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील अमोल असं का वागला, असा सवाल उपस्थित केला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर चर्चेची मागणी, मात्र सरकारकडून OBC विभागासाठी 3,377 कोटींची मोठी तरतूद

नागपूर हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा करावी अशी मागणी केली जात असताना राज्य सरकारने ओबीसी विभागासाठी 3,377 कोटींची भलीमोठी तरतूद केल्याचं वृत्त समोर आलं आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे हा निधी मंजूर करण्यात आला. ओबीसी महासंघाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सामाजिक न्याय भवन येथे अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभेत पिवळ्या रंगाचा धूर, संसदेच्या बाहेर गोंधळ घालणारी ही महिला कोण?

नवी दिल्ली संसदेवरील हल्ल्याला आजच 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आजच लोकसभेत घुसखोरी झाली. यादरम्यान दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या दोघांमध्ये एक महिला आहे आणि दुसरा पुरुष. महिला हरियाणातील हिसार या भागातील असून तिचं नाव निलम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने संसदेच्या बाहेर गोंधळ घातला होता. बुधवारी संसदेचं कामकाज सुरू होतं. या दरम्यान प्रेक्षक […]