ताज्या बातम्या महाराष्ट्र

नागपूरच्या हॉटेलात काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू

नागपूर

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरच्या हॉटेल ली मेरिडीयन येथे काँग्रेस नेत्यांची बैठक सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. जानेवारीमध्ये राहुल गांधी यांची सभा होणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री प्रदेश, कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री डॉ नितीन राऊत, सुनील केदार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष माजी मंत्री वर्षाताई गायकवाड, यशोमती ठाकूर डॉ विश्वजीत कदम, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, नागपूरशहर काँग्रेस अध्यक्ष आ. विकास ठाकरे , ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. भाई जगताप, अमर राजूरकर, नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार अभिजीत सपकाळ आदी नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात