ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा, भाजपाच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाच नेत्याचा समावेश, तिकिट थेट उत्तर प्रदेशातून

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या 195 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता येत्या 10 ते 15 दिवसांत लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच उमेदवार यादी जाहीर करत भाजपानं कुरघोडी केल्याचं मानण्यात येतंय. देशातील 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील भाजपा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. मात्र महाराष्ट्राचा समावेश या यादीत नाही. मात्र महाराष्ट्रातील एकमेव […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रीय निवृत्ती वेतनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, आज विधानसभेत केली घोषणा

मुंबई : राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधान सभेत जाहीर केला. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनसेने पुन्हा मराठी मुद्द्याला घातला हात, आता रेल्वेत मराठी वृत्तपत्र मिळणार!

मुंबई : मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमच आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतं. दुकानांवरील मराठी भाषेतील पाट्या असो वा मराठी तरुणांसाठी रोजगार… राज ठाकरे वेळोवेळी यासाठी आग्रही राहिले आहेत. आता मनसेने पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्याला हात घातला आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. यामध्ये रेल्वे गाड्यांमध्ये मिळणाऱ्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘अंतरिम अर्थसंकल्पावर अर्थमंत्र्यांची छाप दिसली नाही’, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात

मुंबई : यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प हा राज्यातील जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असून या अंतरिम अर्थसंकल्पावर अर्थमंत्र्यांची छाप दिसत नाही. सरकारनं मांडलेल्या विक्रमी पुरवणी मागण्यांमध्ये साडेसहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आणि अडीच हजार कोटी रुपये पिक विम्याचे असताना इतर रक्कम ही कंत्राटदारांना पोसण्यासाठी आहे का, असा सवाल करण्यात आला. पूर्वी ज्या पद्धतीने अर्थसंकल्प मांडायचे आणि आता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

संगणक परिचालकांचे 10 व्या दिवशीही आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरुच!

मुंबई : मागील 12 वर्षापासून राज्यातील सुमारे 29 हजार ग्रामपंचायतमध्ये सुमारे 7 कोटी जनतेला ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे, 20,000 रुपये मासिक मानधनवाढ देणे या दोन प्रमुख मागण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मागील 21 फेब्रुवारी पासून शांततेच्या मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत. आज आंदोलनाचा 10 वा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभेच्या रिंगणात, तटकरेंकडूनही शिक्कामोर्तब

मुंबई बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा असताना त्यांच्याच गटाचे नेते सुनील तटकरे यांनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे बारामतीत आगामी लोकसभा निवडणुकीत नणंद विरूद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सुनील तटकरेंनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. सुनेत्रा पवार बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतंत्र लढलो, तर आम्ही लोकसभेच्या 6 जागा जिंकू; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा विश्वास

नागपूर: आम्ही स्वतंत्र लढलो, तर किमान 6 लोकसभेच्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे रवी भवनला झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही 42 मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या आहेत, त्यामध्ये आमच्या विचारांचे लोक किती आहेत हे दिसून आले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘अर्थसंकल्पात घोषणाचा सुकाळ, शेतकऱ्यांसाठी निधीचा दुष्काळ’; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा अर्थसंकल्प असल्याने राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळ परिसरात विरोधक आक्रमक होत ‘अर्थसंकल्पात घोषणांचा सुकाळ शेतकऱ्यांसाठी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गुणरत्न सदावर्तेंकडून 10 टक्के मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान!

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असताना आता गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणप्रकरणी सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डॉ. जयश्री पाटील यांच्याकडून राज्य सरकारनं जारी केलेल्या 10 टक्के मराठा आरक्षणाला आव्हान देण्यात आलं आहे. 27 फेब्रुवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजकीय पक्ष युवक व वि‌द्यार्थ्यांचे व्होट विकत घेऊ शकत नाही…! – खा. तेजस्वी सूर्या

नागपूर : मागील 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी देशाचा जो आर्थिक विकास केला, त्यामुळे देशाचे नाव संपूर्ण जगात सन्मानाने घेतल्या जात आहे. स्टार्टअप इंडिया आणि मोदींच्या इतर योजनांमुळे आपला देश जगातील पाचवी मोठी आर्थिक महासत्ता बनला आहे, अशा शब्दात भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. G20 संमेलनामुळे देशात सर्वच […]