ताज्या बातम्या राष्ट्रीय

पंतप्रधानांचे बौद्धिक, सत्तेनंतर 100 दिवसांचा कृती आराखडा; तिसऱ्यांदा जिंकण्यावर भाजप ठाम!

नवी दिल्ली : काल रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या कार्यकाळातील शेवटची बैठक झाली. भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार यावर पंतप्रधान मोदींचा ठाम विश्वास असून सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांतील कृती आराखड्यावर मंत्रीपरिषदेत चर्चा झाली. याशिवाय पुढील पाच वर्षांच्या तपशीलवर कृती आराखडा आणि विकसित भारत : २०४७ या व्हिजन डॉक्युमेंटवर चर्चा करण्यात आली. याशिवाय विजयानंतर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : वंचितकडून 3 उमेदवारांची नावं जाहीर, मविआसोबतच्या युतीचं काय?

मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एके ठिकाणी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत निमंत्रण नसल्याचं सांगतात, तर दुसऱ्याच ट्विटमध्ये शरद पवारांनी ६ मार्चला चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचीही माहिती देतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचित आणि मविआ एकत्र लढणार की नाही याबाबत नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. वंचित आणि मविआमध्ये […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती लढतीचे चित्र 

By Supriya Gadiwan कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघासाठी सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता महायुतीकडून खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) विरुद्ध महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती (Shahu Maharaj) अशा संभाव्य लढतीचे चित्र दिसत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे (Mahayuti) उमेदवार म्हणून खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

चांदणी चौकातून भाजपचं तिकीट मिळालं नाही, हर्षवर्धन यांचा राजकारणाला राम राम

नवी दिल्ली गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा यांच्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी ही माहिती दिली. डॉ. हर्षवर्धन यांनी भाजप आणि त्यांच्या सर्व समर्थकांचे आभार मानले. आरएसएस नेतृत्वाच्या विनंतीवरून मी निवडणुकीच्या मैदानात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान; शासकीय गटात ZP शाळा साखरा, खाजगी शाळा गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूल प्रथम

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक शासकीय शाळा गटात वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा साखरा आणि खाजगी शाळा गटात नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल (बेळगाव धागा) शाळेने पटकावले आहे. शासकीय गटात द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली (ता. कर्जत जि. रायगड), तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा घालेवाडी (ता. कवठेमहांकाळ […]

ताज्या बातम्या अन्य बातम्या

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान, दुसऱ्यांदा घेणार जबाबदारी!

लाहोर शाहबाज शरीफ पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान बनले आहेत. त्यांना नॅशनल असेंब्लीमध्ये 201 खासदारांचा पाठिंबा मिळाला. पाकिस्तानी मीडिया ‘द डॉन’ने दिलेल्या माहितीनुसार, 92 खासदारांनी पीटीआय समर्थक उमेदवार उमर अयुब यांना मतदान केले. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष अयाज सादिक यांनी निकाल जाहीर केला. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी नवाज आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपकडून तिकीट दिलेले उमेदवार पवन सिंह यांचा निवडणूक लढवण्यास नकार

नवी दिल्ली भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांनी बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी संध्याकाळी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत १९५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून भोजपुरी स्टार पवन सिंह यांना उमेदवारी दिली होती. आता पवन सिंह यांनी सोशल मीडियावर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अटकेत

मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरण्यात आली होती. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी किंचक नवले याला पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे. त्याला वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपच्या पहिल्या यादीतील मुंबईतील 3 उमेदवार तुम्हाला माहिती आहेत का?

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जय्यत तयारीत सर्वच पक्ष व्यस्त आहेत. यात भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 195 उमेदवारांना तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावांचा समावेश आहे. आगामी निवडणुकीत आपल्या अनेक विद्यमान खासदारांना तिकीट न देण्याचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीच्या अपघातात एकाचा मृत्यू

X: @therajkaran रायगड : अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात एकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातात आमदार दळवी सुखरूप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुरूड-अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी हे शनिवारी मुरूड-नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी उसनी गावानजीकच्या टोलनाक्याच्या परिसरात महेंद्र दळवी यांची गाडी […]