ताज्या बातम्या महाराष्ट्र

धैर्यशील पाटलांच्या खासदारकीमुळे रायगडात भाजपचे आमदार वाढणार! – प्रवीण दरेकर यांना विश्वास  

X : @MilindMane70 महाड – दक्षिण रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील (Dhairyshil Patil) यांची राज्यसभेवर खासदार म्हणून वर्णी लागल्यानंतर त्यांच्या खासदारकीचा निश्चितच उपयोग रायगड जिल्ह्यात भाजपाचे आमदार वाढवण्यासाठी होईल असा विश्वास विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजपा गटनेते प्रवीण दरेकर (BJP leader Pravin Darekar) यांनी व्यक्त केला आहे. प्रवीण दरेकर रायगड (Raigad) जिल्हा दौऱ्यावर असताना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोकणात भाजपाचे आमदार दुपटीने वाढण्याचा दावा

X : @MilindMane70 महाड – भारतीय जनता पक्षाचे (BJP) दक्षिण रायगडचे संयमित नेतृत्व व पक्ष वाढविण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणजे पक्षाने राज्यसभा खासदारकी देऊन धैर्यशील पाटील (Dhairyashil Patil) यांचा सन्मान केला आहे. पाटील यांना पक्षाने दिलेल्या या ताकदीमुळे यापुढील विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात भाजपाच्या सद्यस्थितीत असलेल्या आमदारांची […]

विश्लेषण महाराष्ट्र

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक : भाजपने तयार केली ७५०० कार्यकर्त्यांची फौज

X : @milindmane70 महाड – केंद्रात भाजपा पुरस्कृत एनडीए सरकार (NDA government) आल्यानंतर व महाराष्ट्रात भाजपचा (Maharashtra BJP) दारुण पराभव झाल्यानंतर राज्य भाजपाने कोकण व मुंबई पदवीधर मतदारसंघावर (Konkan and Mumbai graduate constituencies) लक्ष केंद्रित केले आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून पुन्हा एकदा विजय संपादित करण्यासाठी भाजपाने पाच जिल्हे व 48 तालुक्यातून 7 हजार पाचशे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रायगड : जिल्ह्यातील 13 तालुक्यांना गटशिक्षणाधिकारी मिळेना

X : @milindmane70 महाड – शैक्षणिक वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. महिनाभर बंद असलेल्या शाळा पुन्हा बोलक्या झाल्या आहेत.  मात्र रायगड (Raigad) जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी तेरा तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांची (Block Education officer) पदे गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहेत. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षणाचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रायगड […]

महाराष्ट्र

‘राजं सिंहासनाधीश्वर होणार…’ किल्ले रायगडावर 350 व्या राज्याभिषेक दिनाचा उत्साह ; लाखोहुन अधिक शिवभक्तांची गर्दी !

मुंबई : संपूर्ण देशासह अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा संपूर्ण महाराष्ट्र 350 वर्षांपासून ऐकतोय, गातोय. त्यामुळे महाराष्ट्रासाठी शिवजंयती त्याचप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन हा मोठ्या उत्साहाने शिवमय वातावरणात किल्ले रायगडावर साजरा केला जातो .यंदा शिवराज्याभिषेकाला यंदा 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शिवभक्तांमध्येही उत्साहाचं वातावरण असून यानिमित्ताने रायगडावरही तयारी पूर्ण झाली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीच्या अपघातात एकाचा मृत्यू

X: @therajkaran रायगड : अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात एकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातात आमदार दळवी सुखरूप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुरूड-अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी हे शनिवारी मुरूड-नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी उसनी गावानजीकच्या टोलनाक्याच्या परिसरात महेंद्र दळवी यांची गाडी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नवं पक्ष चिन्ह ‘तुतारी’सह शरद पवारांचं रायगडावर शक्तिप्रदर्शन

रायगड केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नवं पक्षचिन्ह मिळाल्यानंतर आज शरद पवार रायगडावर शक्तिप्रदर्श केलं. यावेळी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात म्हणूनही या कार्यक्रमाकडे पाहिलं जात आहे. रायगडावर होणाऱ्या या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित आहेत. रायगड किल्ला चढण्यासाठी अवघड आहे. यामुळे […]

जिल्हे ताज्या बातम्या

महाड: अन्यथा उर्दू शाळेला टाळे ठोकू पालकांचा इशारा

X: @milindmane70 महाड: रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये सातत्याने होणाऱ्या शिक्षकांच्या कार्यशाळा, सरकारी कामे यामुळे तालुक्यातील अनेक एक शिक्षकी शाळा कायम बंद राहत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून शाळेला आणखी एक शिक्षक जर दिला गेला नाही, तर टाळे ठोकू, असा इशारा कांबळे तर्फे महाड येथील शाळेतील पालकांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दिला आहे. जिल्हा परिषद शाळांची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रायगड : “शासन आपल्या दारी” कार्यक्रमासाठी ७०० एसटी बसेस आरक्षित

X : @milindmane70 महाड “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातल्या नऊ आगारांमधून ७०० एसटी बसेस आरक्षित केल्या आहेत. या कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत. यामुळे एस.टी.बसेसचा तुटवडा जाणवणार असल्याने पंधरा तालुक्यातील प्रवाशांवर ५ जानेवारी रोजी पायी वारी करण्याची वेळ येणार आहे. माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च व तंत्र शिक्षण विद्यापीठाच्या […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

“शासन आपल्या दारी” मात्र एका दाखल्यासाठी महिला वणवण करी

X : @milindmanne70 महाड “शासन आपल्या दारी” हा महायुती सरकारचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठाच्या आवारात ५ जानेवारी रोजी मोठ्या धुमधडाक्यात व वाजतगाजत साजरा होत आहे. मात्र, दुसरीकडे महाड तालुक्यातील एका अंध व्यक्तीची धर्मपत्नी तिचा पती अंध असल्याचा दाखला मिळण्यासाठी शासन दरबारी वणवण भटकत आहे. प्रशासकीय अधिकारी […]