महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mumbai Politics: “उद्धव ठाकरेंसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका

मुंबई: गेल्या पंचवीस वर्षांत सत्तेत असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मुंबई (Mumbai) ही “सोन्याची अंडी देणारी कोंबडी” होती, अशी घणाघाती टीका करत, कोविड काळातील खिचडी घोटाळा, बनावट कोविड सेंटर आणि बॉडीबॅग घोटाळ्यांचे आरोप असलेल्यांनी टोमणे मारण्याऐवजी आधी स्वतःकडे पाहावे, असा सणसणीत टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी लगावला. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC elections : उद्धव सेना–मनसे युतीत भांडुप, लोअर परळ आणि माहिममध्ये अडथळे

X: @vivekbhavsar मुंबई: मुंबई महापालिकेत (BMC) पुन्हा सत्तेत येण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान ११४  जागा थेट जिंकणे कठीण असल्याची जाणीव दोन्ही नेत्यांना आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंनी किमान एकत्रित […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Khair Wood Smuggling: बोलेरोतून खैराची अवैध वाहतूक वनखात्याने पकडली

महाड: महाड-पंढरपूर रस्त्यावर राजेवाडी गावाजवळ बोलेरो पिक-अप वाहनातून (Bolero Pickup Vehicle) खैराची अवैध वाहतूक (Illegal Transportation of Khair Wood) करणाऱ्या आरोपीसह वाहन जप्त करण्यात वनखात्याने मोठी कारवाई (Forest Department Action Mahad) केली आहे. मुंबई-राष्ट्रीय महामार्गावरील राजेवाडी गावाजवळील उड्डाणपुलाजवळ वनखात्याचे कर्मचारी गस्त घालत असताना एमएच-23-डब्ल्यू-2778 हा बोलेरो पिक-अप संशयास्पद दिसल्याने तपासणी केली असता वाहनात खैराचे सोलिव […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

CM Devendra Fadnavis : तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करा; मेट्रो शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री वॉररुम (War Room Meeting) बैठकीत ३० पायाभूत सुविधा प्रकल्पांचा (Infrastructure projects) आढावा घेताना प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. “वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका”, असे सांगत त्यांनी वॉररुममधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. बैठकीत मुंबई (Mumbai) आणि राज्यातील विविध मेट्रो प्रकल्प (Metro rail […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MNS : डोंबिवलीच्या विकासाला लागलेलं ‘चांदभाई’चं ग्रहण – राजू पाटील यांचा आरोप

डोंबिवली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील (Former MNS MLA Raju Patil on Palava bridge) यांनी डोंबिवलीच्या पलावा पुलाच्या दर्जाहीन कामावरून हल्ला चढवत सरकारवर आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे. राजू पाटील यांनी म्हटले की, ४ जुलै रोजी लोकार्पण झालेल्या पलावा पुलाला अवघ्या ३० दिवसांत खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. “पाणी अडवा, पाणी […]

विश्लेषण महाराष्ट्र

…तर शिंदे याची शिवसेना फुटायला वेळ लागणार नाही!

X : @vivekbhavsar महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे भारतीय जनता पार्टी (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कौल दिलेला आहे. 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी नऊ जागा जास्त देत भाजपला स्पष्ट बहुमताच्या जवळ आणून ठेवले आहे. भाजपचे स्वतःचे 132 आमदार आणि पाच अपक्ष आमदारांचा पाठिंबा याशिवाय 41 उमेदवारांना जिंकून आणलेल्या अजित पवारांच्या (Ajit […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दोन पक्ष फोडूनही भाजप पिछाडीवर!

X: @vivekbhavsar मुंबई: आजपासून 12हा 13 वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 2012 च्या आसपास नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय स्तरावर उदय झालेला होता. समाज माध्यमांचा अत्यंत योग्य पद्धतीने वापर करून नरेंद्र मोदी यांनी स्वतःची विकास पुरुष आणि गुजरातचे विकास मॉडेल हे देशभर लोकांच्या मनात रुजवले होते. मोदींबद्दल एक अपेक्षा आणि आशा निर्माण झाली होती. त्यातूनच पुढे 2014 च्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आडम मास्तरांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सोलापूर मध्य मतदार संघावर दावा

X : @vivekbhavsar काँग्रेससह महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचे जवळपास २६० जागांवर एकमत झाले आहे. २८ जागांबाबत अजूनही वाद सुरू आहेत. या २८ जागांमध्ये खास करून समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अन्य छोट्या घटक पक्षांना किती जागा द्याव्या, यावरून वाद सुरू  आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने 12 जागांची मागणी केली होती, मात्र चार जागांवर त्यांचा […]

मुंबई

लाडकी बहिण जोरात, गर्भवती महिला धोक्यात; बोरीवलीत महिलांची ससेहोलपट 

By Yogesh Trivedi मुंबई: एका बाजूला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी जोरजोरात डांगोरा पिटला जातोय आणि सुमारे दोन कोटी महिलांच्या खात्यात दर महिन्याचे दीड दीड हजार रुपये जमा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला गर्भवती महिलांना बोरीवली पूर्व येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयातून माता व बालक रुग्णालयात आणि तेथून परळच्या राजे एडवर्ड स्मृती बाह्य […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जम्मू काश्मीरच्या जनतेने भाजपच्या विद्वेषी व विभाजवादी राजकारणाला हद्दपार केले : नाना पटोले 

X : @therajkaran मुंबई: जम्मू – काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) व नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) आघाडीने बहुमत मिळवले आहे. जम्मू व काश्मीर या दोन्ही भागात इंडिया आघाडीने (INDIA alliance) मोठा विजय मिळवला आहे. छोटे पक्ष व अपक्ष यांच्या मदतीने मतविभाजनाचा भाजपचा डाव हाणून पाडत जनतेने भाजपला हद्दपार केले […]