ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा 29 पटींनी वाढला भाजपा? अवघ्या 5 महिन्यांत 10 कोटींहून अधिक सदस्य, 21 राज्यांत सरकार

नवी दिल्ली- 2014 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा मुंबईच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सभेत करण्यात आली. त्यानंतर गेल्या 10 वर्षांत भाजपाचा विस्तार प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे. 2014 नंतर भाजपानं सत्तेत आल्यानंतर सर्वसमावेशक भूमिका घेत, पार्टी विथ डिफरन्स या मूल्याला बाजूला ठेवत पक्षाचा विस्तार केला. देशातील सर्व प्रांतात, सर्व जाती-धर्मांत भाजपाचा झालेला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर नारायण राणेच ठरले महायुतीचे उमेदवार

प्रकल्प पूर्ण करू शकणारा लोकप्रतिनिधी ठरली जमेची बाजू X: @ajaaysaroj मुंबई: बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि अत्यंत हाय व्होल्टेज ड्रामा अपेक्षित असलेल्या सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघातून (Sindhudurg – Ratnagiri Lok Sabha)अखेर महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP candidate Narayan Rane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील (Mahavika Aghadi) शिवसेना उबाठा गटाच्या विनायक राऊत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकांसाठी संघाची विशेष मोहीम, संघटनात्मक हालचालींना वेग

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यासंदर्भात नियोजन सुरू केले आहे. संघाकडून प्रत्यक्षात राजकीय पक्षाचा प्रचार करण्यात येत नसला तरी संघाकडून मतदानवाढीसाठी पुढाकार घेतला जात आहे. लोकसभेसाठी संघ परिवारातर्फे विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून छोट्या बैठकांचं आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकांच्या माध्यमातून स्वयंसेवकांना सक्रियपणे काम करण्याचे निर्देश […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Prakash Ambedkar : ठाकरे, पवार यांनी विश्वास गमावला? वंचित मविआतून बाहेर…. मात्र काँग्रेसला सात जागांचा प्रस्ताव

X : @NalavadeAnant मुंबई: महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार व ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे जागावाटपात आपल्याला धोका देत आहेत असा ग्रह झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी एक पत्रक काढत ठाकरे, पवार यांनी विश्वास गमावल्याची टिका करत थेट मविआतून बाहेर पडल्याचे जाहीर केले. मात्र काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या सात जागांवर पाठिंबा देण्याची […]

महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘अल्पसंख्याक’ची व्याख्या देशाचं विभाजन करणारी, घटनेतील व्याख्येचा पुनर्विचार व्हावा, काय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी?

नागपूर – देश जर सगळ्यांचा असेल तर या देशात कुणी अल्पसंख्याक कसे, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी उपस्थित केलेला आहे. अल्पसंख्याक याची सध्याची व्याख्या ही देशाचं विभाजन करणारी आहे, त्यामुळे घटनेतील या व्याख्येचा पुनर्विचार होण्याची गरज असल्याचं मतही होसबाळे यांनी व्यक्त केलेलं आहे. देशआतील अल्पसंख्याक लांगूलचालनाला संघानं स्थापनेपासून विरोध केलेला आहे, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अल्पसंख्याक समाजाची संघाशी जवळीक वाढली – मनमोहन वैद्य

संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला प्रारंभ X: @therajkaran नागपूर: गेल्या काही वर्षात अल्पसंख्याक समाजाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक वाढली आहे. त्यांच्यातील संभ्रम आणि भीती हळूहळू कमी होत आहे. संघ देखील अल्पसंख्याकांमध्येही आपली सक्रियता वाढवत असल्याचे प्रतिपादन संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले. नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मणिपूर, संदेशखालीसह ‘या’ चार महत्त्वाच्या विषयांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेत चर्चा, नवे सरकार्यवाह कोण?

संघ आणि संघ परिवारातील भाजपा, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यासह ३६ संघटनांचे १५०० हून अधिक पदाधिकारी तीन दिवसांच्या या बैठकीला उपस्थित आहेत.

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवतारेंना आवरा, अन्यथा…

आनंद परांजपेंचा इशारा मात्र कल्याण लोकसभेची आकडेवारी काय सांगते? X: @therajkaran विजय शिवतारेंच्या बदला घेण्याच्या आक्रमक बोलीने अजित पवारांना बारामतीमध्ये बॅकफूटवर नेले आहे. स्वाभाविकच राष्ट्रवादीमधून त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच इशारा देत, वाचाळ शिवतारेंना आवरा, अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळे चित्र दिसेल असे सुनावले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

चांदणी चौकातून भाजपचं तिकीट मिळालं नाही, हर्षवर्धन यांचा राजकारणाला राम राम

नवी दिल्ली गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा यांच्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी ही माहिती दिली. डॉ. हर्षवर्धन यांनी भाजप आणि त्यांच्या सर्व समर्थकांचे आभार मानले. आरएसएस नेतृत्वाच्या विनंतीवरून मी निवडणुकीच्या मैदानात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रकाश आंबेडकरांची स्वतंत्र चूल की भाजपसोबत जाणार? आघाडीकडे चर्चेसाठी ४८ पैकी २६ जागांचा प्रस्ताव सादर

X : @therajkaran मुंबई: प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi – MVA) लेखी पत्र देऊन महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ पैकी २६ जागांवर आघाडी करण्यासाठी चर्चा होऊ शकेल, असे स्पष्ट केले. वंचितने या २६ मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी तयारी केली आहे, पण आता महाविकास आघाडी आमच्यासोबत जागा वाटपाची चर्चा करण्यास […]