महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रशासकीय व विनंती बदल्यांबाबत तातडीने निर्णय घ्या – अधिकारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : राज्य शासनाच्या विविध खात्यांतील प्रशासकीय व विनंती बदल्यांचा निर्णय अद्यापही रखडल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांवर अन्याय होतो आहे. त्यामुळे या बदल्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आज दिलेल्या निवेदनातून केली आहे.

महासंघाने निदर्शनास आणले आहे की, अनेक अधिकाऱ्यांना कौटुंबिक तसेच आरोग्यविषयक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय, त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू असून, नवीन ठिकाणी स्थिरावण्यासाठीही वेळ आवश्यक असतो. त्यामुळे बदल्यांची प्रक्रिया विलंबित न करता तत्काळ पूर्ण करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व विलंब प्रतिबंध अधिनियम, 2005 नुसार, नियमित बदल्यांची प्रक्रिया 31 मे 2025 पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. एसएससी, सीबीएसई, आयसीएसई यांसारख्या विविध अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वेळापत्रकाचा विचार करता बदल्यांचे नियोजन 30 एप्रिल किंवा फारतर 31 मेपर्यंत होणेच व्यवहार्य ठरते, हे महासंघाने अधोरेखित केले आहे.

वस्तू व सेवा कर, सहकार, वित्त व लेखा, अभियंता संवर्ग, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण, महसूल, विकास सेवा अशा अनेक विभागांतील नियमित तसेच विनंती बदल्यांची प्रक्रिया रखडल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. निकषात बसणाऱ्या विनंती बदल्यांवरही कार्यवाही होत नसल्याने अनेक अधिकारी आजही गैरसोयीच्या ठिकाणी काम करत आहेत.

या निवेदनाच्या प्रती महासंघाने राज्याचे मुख्य सचिव व सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्यसचिव (सेवा) यांनाही पाठवून तातडीच्या कार्यवाहीची मागणी केली आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात