तेलंगणा
तेलंगणात काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवताना दिसत आहे. तेलंगणाची निर्मिती २०१३ मध्ये झाली. म्हणजे त्यानंतरची ही तिसरी निवडणूक आहे. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले केसीआर यांच्यांसाठी हे मोठं अपयश मानलं जात आहे. केसीआर यांच्या अपयशामागील मुख्य कारण त्यांचा राष्ट्रीय राजकारणाकडे असणारा कल मानला जात आहे.
बीआरएसच्या अपयशामागील १० कारणं
- केसीआर यांच्या अपयशामागील मुख्य कारण त्यांचा राष्ट्रीय राजकारणाकडे असणारा कल मानला जात आहे.
- तज्ज्ञांनुसार, केसीआर स्वत:ला राष्ट्रीय नेता म्हणून स्थापित करू पाहत होते. त्यांना तेलंगणात विजय मिळण्याचा अतिआत्मविश्वास होता.
- तेलंगणाच्या निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असताना केसीआर तेलंगणाच्या बाहेर महाराष्ट्रात ७००-७०० जणांच्या ताफ्यासह पक्षाचा प्रचार करीत होते.
- या रॅलींमध्ये त्यांच्यासह संपूर्ण तेलंगणाची कॅबिनेटही जात होती.
- इतकच नाही तर केसीआर विविध राज्यांमध्ये जाऊन विरोधी पक्षांची भेट घेत होते. त्यांनी जूनमध्ये पाटन्याला नितीश कुमारांची भेट घेतली होती.
- तेलंगणातील सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेत दिले जात नसल्याने जनतेमध्ये नाराजी होती. तेथे महिन्याच्या १८ ते १६ तारखेला पगार दिला जात होता.
- याशिवाय ट्रान्सफर पोस्टिंगवरुन लोकांमध्ये नाराजी होती. पती-पत्नी दोघांची पोस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्याने नाराजीचं चित्र होतं.
- नोकरीसाठीच्या परीक्षांमधील गोंधळ वाढत होता. पेपर लिकच्या घटनांमुळे तरुण नाराज होते. ते परीक्षेची तयारी करीत, मात्र पेपर लिकमध्ये परीक्षा रद्द केली जात होती.
- के चंद्रशेखर यांच्या सत्तेत तरुण नाराज होते. गेल्या ९ वर्षात तेलंगाणा राज्य लोक सेवा आयोगाने एकही नोटिफिकेशन योग्य पद्धतीने काढला नव्हता. जे नोटिफिकेशन निघालं त्यातही गोंधळ झाला. यामुळे तरुण वर्ग बीआरएसच्या कामावर संतुष्ट नव्हता.
- बीआरएस सुप्रीमो चंद्रशेखर यांच्या कमकुवतपणाचे कारण म्हणजे गेली नऊ वर्षे सत्ता एकाच घराण्याकडे आहे असे तेथील जनतेला वाटत होते.