X: @therajkaran
लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabah elections) सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. ‘अब की बार 400 पार’ असा नारा भाजपाकडून (BJP) देण्यात आला आहे. त्यांच्या या नाऱ्यावर आता विरोधकांकडून निशाणा साधण्यात आला आहे. भाजपाला देशाचे संविधान (Constitution of India) बदलण्यासाठी बहुमत हवे आहे, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे. तर, ईडी म्हणजे भाजपाची हप्ता वसुली एजंट आहे, अशी टीकाही राऊतांकडून करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, भाजपाने दिलेला 400 पारचा नारा हा तसा नाही, तर भाजपा तडीपार असा आहे. कारण त्यांनी तशी घोषणा केलेली असली तरी, इलेक्टोरल बॉण्डच्या घोटाळ्यामुळे (Electoral bond scam) ते शक्य नाही. कारण ज्यांना – ज्यांना धंदा दिला, त्या सर्वांकडून चंदा घेतला आहे. यापेक्षा मोठा घोटाळा देशाच्या इतिहासात झालेला नाही. इतर देशात हा घोटाळा झाला असता तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला असता. देशात आता तिसऱ्यांदा मोदी त्यांचे सरकार येणार नाही. संविधान बदलण्याचा त्यांचा कट आहे, म्हणूनच तर त्यांना 400 पेक्षा अधिक जागांचे बहुमत हवे आहे. कारण संविधान बदलल्यानंतर ते भ्रष्टाचाराला (corruption) शिष्टाचाराचे नाव देतील, असा थेट आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे महात्मा गांधी (Mahatma Gandhi – Father of Nation) ‘फादर ऑफ नेशन’ आहेत, त्याचप्रमाणे ‘मोदी फादर ऑफ करप्शन’ (Modi – Father of corruption) आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
हुकूमशाहीला (dictatorship) सुरुवात झाली आहे. पण ज्या पद्धतीचा इलेक्टोरल बॉण्डच्या भ्रष्टाचाराचा घोटाळा समोर आलेला आहे, तो फक्त शहरापुरता मर्यादित नाही, तर गावाच्या शेवटच्या माणसांपर्यंत फक्त मी खाणार, हा मेसेज गेला आहे. मी आणि माझ्या लोकांना खाता यावे, यासाठी दरोडा टाकू चोरी करू, काहीही करू असा पंतप्रधान मोदींचा मेसेज गावातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला आहे. त्याच्यामुळे मोदींचे भ्रष्ट सरकार पुन्हा येणार नाही. हे सरकार म्हणजे देशाला लागलेला कलंक आहे आणि कलंक पुसावा लागणार आहे, असेही राऊतांकडून सांगण्यात आले.