X : @therajkaran
मुंबई: अलीकडील घडामोडींमध्ये, आम आदमी पार्टी (AAP) आणि इंडिया (INDIA) आघाडी अंतर्गत काँग्रेस यांच्यातील जागा वाटप चर्चेच्या यशस्वी निष्कर्षाने भारतीय जनता पार्टी (भाजप) खवळला आहे. INDIA आघाडीच्या राजकारणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडते पुढे असे स्पष्ट झाले आणि त्यामुळे भाजप ने INDIA आघाडी मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरु केलेले आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून, AAP आणि काँग्रेस यांच्यातील वाटाघाटी सकारात्मक प्रगतीच्या दिशेने जात आहेत, त्यामुळे भाजपकडून अनपेक्षित प्रतिक्रिया आली आहे. आपल्या राजकीय गडाला धोका जाणवत असलेल्या भाजपने INDIA आघाडीला अस्थिर करण्यासाठी मेगा-प्लॅन किंवा “महा-षडयंत्र” म्हणून प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केला आहे.
‘आप’चे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध सी.बी.आय. कारवाईच्या धमक्या देऊन ‘आप’च्या वरिष्ठ नेत्यांना धमकावले जात असल्याचे वृत्त समोर आले आहे. अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) कडून गेल्या दोन वर्षांत सतत छळवणूक आणि निराधार तपासाच्या पार्श्वभूमीवर हे घडत आहे, ह्या सर्व यंत्रणा कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात अयशस्वी झाले आहेत.
“हे स्पष्ट आहे की अरविंद केजरीवाल याना लक्ष्य करून इंडिया आघाडीला कमकुवत करण्याचे प्रयत्न भाजप करत आहे. भीती आणि बळजबरी प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections 2024) एकत्रित विरोधकांना सामोरे जाण्याची भाजपची (BJP) भीती अधोरेखित करतो.” असे वक्तव्य आम आदमी पार्टीचे मुंबई उपाध्यक्ष संदीप मेहता यांनी केला.
“या धमक्यांना न जुमानता, AAP भारतातील लोकांप्रती आपली बांधिलकी आणि काँग्रेससोबतच्या युतीमध्ये स्थिर आहे. AAP भाजपच्या डावपेचांना न घाबरता, राजकीय सूडबुद्धीच्या वर देशाच्या हिताची सेवा करण्यास कटिबद्ध आहे. भाजपचे लक्ष हे कुठल्याही परिस्थिती सत्ता हस्तगत करणे आहे. हि बाब भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक असून. भाजप हा सद्य परिस्थितीत लोकशाहीच्या सर्व मूल्यांना पायदळी तुडवत शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत आहे जी सरळ सरळ अघोषित आणीबाणी आहे” असा आरोप आम आदमी पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष संदीप कटके यांनी केला.
अशा परिस्थितीत लोकशाहीला वाचवण्याचे कर्तव्य हे सर्व भारतीय जनतेचे आहे असे सांगत राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन, यांनी जनतेला आवाहन केले की त्यांनी भाजपच्या निराशाजनक युक्त्या पाहावे आणि भारतातील सर्वसमावेशक आणि प्रगतीशील शासनाच्या आशेचा किरण असलेल्या INDIA आघाडीसोबत एकजुटीने उभे रहावे.
Also Read: भाजपचेही बडे नेते आमच्या संपर्कात : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले