महाराष्ट्र ताज्या बातम्या

नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती गठीत करणार

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या (Urban cooperative banks) अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्याचा निर्णय बुधवारी येथे घेण्यात आला.

राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या प्रश्नांच्या निराकरणासंदर्भात आज भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील अनेक नागरी सहकारी बँका आज अडचणीचा सामना करत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या कडक निकषामुळे त्यांच्यावर अनेक प्रकारच्या व्यवहारांवर बंधने आली आहेत. अशा परिस्थितीत ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहावा या एकमेव उद्देशाने भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या विनंतीवरून आज सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील (Minister Dilip Walse-Patil) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नागरी सहकारी बँकांपुढील प्रश्न सोडविण्यासंदर्भात शासनाकडून नेमकी कोणती मदत अपेक्षित आहे. यासंदर्भात शासनाचे धोरण काय असावे, सहकार कायद्यात नेमक्या काय दुरुस्त्या कराव्यात यासंदर्भात चर्चा झाली.

यावेळी सहकार मंत्री वळसे-पाटील यांनी राज्य शासन याबाबत सकारात्मक निर्णय घेईल आणि राज्यातील नागरी सहकारी बँकांना अडचणीतून बाहेर काढेल असा विश्वास दिला. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे (MSC Bank) प्रशासक विद्याधर अनास्कर (Vidyadhar Anaskar) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात यावी आणि या समितीने लवकरात लवकर आपला अभ्यास अहवाल शासनाला सादर करावा असा निर्णय घेण्यात आला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात