महाराष्ट्र ताज्या बातम्या

RS Election: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश असून, या जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रासह ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या जागांसाठीही त्याच दिवशी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेचे विद्यमान सदस्य डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपणार आहे.

या निवडणुकीची अधिसूचना २६ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ मार्च आहे. ६ मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून, ९ मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील.

मतदान १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होईल. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात