महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रशांत कोरटकरसोबत फडणवीसांच्या कार्यालयातील प्रतिक पडवेकर होता का? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे – अतुल लोंढे

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरला तेलंगणातील मंचरेला येथे अटक करण्यात आली. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील प्रतिक पडवेकर त्याच्या सोबत होता का? याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

कोंढे यांनी आरोप केला की, कोरटकरच्या अटकेसंबंधी काही माहिती लपवली जात आहे. महिनाभर त्याला मदत करणारे कोण? त्याला लपून बसण्यास कोणी पाठिंबा दिला? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. गृहमंत्र्यांनी यासंबंधीची संपूर्ण माहिती जनतेसमोर आणावी, असे लोंढे यांनी स्पष्ट केले.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात