ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख झाला तेव्हा संजय राऊत कुठे होते ?

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

महाविकास आघाडीचे सरकार असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Hiduhrudaysamrat Balasaheb Thackeray) यांच्या नावापुढे ‘हिंदुहृदयसम्राट’ ही उपाधी लावणे का बंद केले..? याचे उत्तर उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रातील जनतेला आणि तमाम शिवसैनिकांना द्यावे, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. ज्योती वाघमारे (Prof Jyoti Waghmare), अरुण सावंत (Arun Sawant) आणि सौ. शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आयुष्यात कधीही कोणत्याही पदाचे किंवा उपाधीसाठी भुकेले नाहीत. पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने त्याना देऊनही त्यांनी ‘शिवसेनाप्रमुख’ किंवा ‘पक्षप्रमुख’ न होता शिवसेनेचा ‘मुख्यनेता’ होणं पसंत केल, सर्वसामान्य शिवसैनिकाचे (Shivsainik) हात बळकट करून सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे ते कामाला लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर केलेली टीका सहन करणार नाही, असा इशारा या प्रवक्त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल राजस्थान (Eknath Shinde on Rajasthan tour) दौऱ्यावर असताना काही शिवसैनिकांनी त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या पोस्टरवर ‘हिंदुहृदयसम्राट’ अशी उपाधी दिली होती. त्यावर सकाळचा भोंगा म्हणून सुपरिचित असलेले उबाठा गटाचे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी टीका करत शिवसेनाप्रमुख हे एकच असून फक्त बाळासाहेब ठाकरे यांना आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी लावण्याचा अधिकार असल्याची टीका केली होती.

राऊत यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी, जेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘जनाब’ असा करण्यात आला तेव्हा राऊत मूग गिळून गप्प का बसले? असा सवाल विचारला. तर शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikasa Aghadi sarkar) असताना स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना ‘हिंदुहृदयसम्राट’ ही उपाधी न देता त्यांचा उल्लेख फक्त ‘वंदनीय’ बाळासाहेब ठाकरे असा करायला सुरुवात झाली.

हिंदुहृदयसम्राट ही उपाधी न लावण्यामागे नक्की कोणती कारणे होती, असा सवाल म्हात्रे यांनी विचारला आहे. तर शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी उबाठा गटाचे संजय राऊत यांना आता कुणी विचारत नसल्याने कधी ‘मै नंगा हू’, बाईट देताना केमेरासमोर थुंकणे, कुणाबद्दलही काहीही बरळणे असे उद्योग त्यांनी सुरू केले आहेत. वैफल्यग्रस्त झाल्यानेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली असल्याचे मत सावंत यांनी व्यक्त केले आहे.

शिवसैनिकांच्या मनात ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हंटलं की कायमच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव येते. त्यामुळे शिवसैनिकांना खरे ‘हिंदुहृदयसम्राट’ कोण..? हे सांगण्याची गरज नाही, तसा आमचा प्रयत्न नाही. त्यामुळे विश्वप्रवक्त्यांनी उगाच काळजी करू नये. उलट सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पायाशी लोटांगण घालताना नक्की कुणाच्या भावना दुखवू नयेत यासाठी शिवसेनाप्रमुखांना ‘हिंदुहृदयसम्राट’ ही उपाधी देणे बंद केलेत ते आधी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे, अशी मागणी शिवसेनेच्या तिन्ही प्रवक्त्यांनी केली आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात