विश्लेषण

शिशिर धारकरांच्या सेना प्रवेशामुळे पेण विधानसभा मतदारसंघात भगवा फडकणार?

Twitter : @milindmane70

मुंबई

रायगड जिल्ह्यातील पेण चे माजी नगराध्यक्ष आणि पेण अर्बन बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शिशिर धारकर यांनी ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला (Shishir Dharkar joins UBT Shiv Sena). बँक घोटाळ्यातील आरोपीला उद्धव ठाकरे यांनी पक्षात प्रवेश दिल्याने राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. मात्र, बादलेली राजकीय परिस्थिति, भाजपबद्दल असलेला असंतोष याचा फटका पेण विधानसभा मतदारसंघात भाजपाला बसेल आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा या मतदारसंघात फडकेल, असा दावा केला जात आहे.

पेण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकण्यास शिशिर धारकर यांचा पक्षप्रवेश कारणीभूत ठरणार असून शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), काँग्रेस यांच्या मदतीने आमदार होण्याचा धारकर यांचा मार्ग सुकर झाला असून भाजपाच्या रवीशेठ पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

पेण विधानसभा मतदारसंघावर शेका पक्षाचे वर्चस्व होते. 2009 पूर्वी रवी शेठ पाटील (Ravisheth Patil) यांनी काँग्रेस पक्षातून विजय संपादित केला होता. त्यानंतर 2009 व 2014 या दोन विधानसभा निवडणुकीत शेका पक्षाच्या धैर्यशील पाटील यांनी विजय संपादित केला होता. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत कॉँग्रेसचा त्याग करून भाजपकडून (BJP) लढलेले रवीशेठ पाटील यांनी शेकापचे धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil of PWP) यांचा पराभव केला. शिवसेनेला आजपर्यंत या मतदारसंघात विजय संपादित करता आलेला नाही. मात्र, आज शिशिर धारकरांच्या रूपाने शिवसेनेला विजय प्राप्त करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, अशी परिस्थिती सध्या तरी या मतदारसंघात दिसत आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नागोठणे येथील किशोर शेठ जैन यांनी 44 हजार 251 मते घेतली होती. मात्र त्यांना यश संपादित करता आले नाही.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena) गटात प्रवेश केलेले शिशिर धारकर यांचा पूर्व इतिहास पाहता त्यांचे वडील आप्पासाहेब धारकर (Appasaheb Dharkar) हे काँग्रेसच्या काळात राज्यमंत्री होते. 1980,1986 व 1990 ते 1996 या काळात ते विधान परिषद सदस्य होते. राज्यमंत्रीपद भूषवलेले अप्पासाहेब धारकर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister of Raigad) देखील होते. शिशिर धारकर पेण अर्बन बँकेतील घोटाळ्यातील मुख्य आरोपी असले तरी त्यांच्याकडे जवळपास 50 हजाराची स्वतःची मते आहेत. याच मतांच्या जोरावर व शिवसेनेची मते तसेच महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्यास काँग्रेसचे मते व शेतकरी कामगार पक्षाची ताकद, या सर्व मतांच्या बेरजेच्या राजकारणात शिशिर धारकर यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुकर ठरू शकतो.

शिशिर धारकर यांचा पेण अर्बन बँकेतील घोटाळ्यात मुख्य सहभाग (Main accused in the Pen Urban Bank scam) असला तरी, त्यांनी अनेक लोकांचे संसार जगवण्याचे काम केल्याची चर्चा मतदारसंघात ऐकण्यास मिळते. त्या जोरावर ते विधानसभा निवडणुकीत भाजपाशी लढत देऊ शकतील. शिवसेनेच्या जोडीला काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, वंचित बहुजन आघाडी सोबत राहिल्यास भाजपा उमेदवारला ही निवडणूक अडचणीची ठरू शकेल. किंबहुना या मतदारसंघात रवीशेठ पाटील यांना भाजप पुन्हा उमेदवारी देणार का ? की वयोमानानुसार त्यांचे पुत्र वैकुंठ शेठ पाटील यांना उमेदवारी देणार? की शेतकरी कामगार पक्षातून भाजपात गेलेले धैर्यशील पाटील यांना अथवा त्यांची पत्नी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नीलिमा पाटील यांना उमेदवारी मिळणार? असे अनेक प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत. कदाचित यामुळेच या मतदारसंघात भाजपात उमेदवारीवरून फुटीची बिजे रोवली जाऊ शकतील, अशी शक्यता आहे.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत पेण मतदार संघातील प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

धैर्यशील मोहन पाटील (शेतकरी कामगार पक्ष) 60757

रवीशेठ दगडू पाटील (काँग्रेस) 53141

अनिल दत्तात्रय तटकरे (अपक्ष) 49,992

हरिश्चंद्र भागुराम बेकवडे (अपक्ष) 4,642

रवींद्र बाळाराम पाटील (अपक्ष) 1,452

2014 च्या निवडणुकीत पेण विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी:

धैर्यशील मोहन पाटील (शेतकरी कामगार पक्ष) 64,616

रवीशेठ पाटील (काँग्रेस) 60,496

किशोर अवतरमल जैन (शिवसेना) 44,251

संजय जांभळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) 11,387

राम शेठ घरत (भारतीय जनता पार्टी) 9,452

2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते

रवीशेठ पाटील (भारतीय जनता पार्टी) 1,12,380 (52.% टक्के)

धैर्यशील मोहन पाटील (शेतकरी कामगार पक्ष) 88,329 (40.91% टक्के)

नंदा राजेंद्र म्हात्रे (काँग्रेस पक्ष) 2,330. (1.08 टक्के)

रमेश गुरु पवार (वंचित बहुजन आघाडी) 1413 (0.65%)

एकंदरीत पेण विधानसभा मतदारसंघातील मागील तीन निवडणुकीची आकडेवारी बघितल्यास 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व शिवसेना एकत्र राहिल्यास शिवसेनेचे शिशिर धारकर यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर होऊ शकेल.

पेण विधानसभा मतदारसंघात आगरी, कोळी या समाजाबरोबरच कुणबी समाज तसेच सुधागड, रोहा व पेण तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाजाचे (Adiwasi Thakur) देखील मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे. हा समाज शेतकरी कामगार पक्षासह शिवसेनेसोबत देखील आहे. याचाच फायदा शिशिर धारकर यांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला आतापर्यंत विजय संपादित करता आला नव्हता, धारकरांच्या रूपाने या मतदारसंघावर भगवा फडकण्याची दाट शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

विश्लेषण महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

@vivekbhavsar मुंबई मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी
विश्लेषण

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा ‘माधव’ तर पवारांचा ‘मराठा माळी बहुजन’ फॉर्मुला!

Twitter : @manemilind70 मुंबई काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, शिंदे