ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘सरकारकडून काय करावी आशा तरुणांच्या माथी मारली ड्रगची नशा’; विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने

नागपूर

नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक ड्रगमाफिया ललित पाटील प्रकरणी आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत सरकारकडून काय करावी आशा, तरुणांच्या माथी मारली ड्रगची नशा’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर ड्रॅगने तरुणाई उध्वस्त करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, तरुणाईला नशेच्या खाईत लोटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ड्रॅग माफियांवर कारवाई न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत सरकार विरोधात निदर्शने केली.

नागपूर येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले.

‘रुग्णालयाचे डीन आहेत की ड्रग डीलर, सबका कातील ललित पाटील, ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करा, उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र, सरकारकडून काय करावी आशा, तरुणांच्या माथी मारली ड्रगची नशा अशा विविध घोषणा लिहिलेले फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात