ताज्या बातम्या राष्ट्रीय

छत्तीसगडमध्ये महिला आमदारांनी रेकॉर्ड मोडले, अन्य तीन राज्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी

रायपूर

राजकारणातील महिलांचा वाटा हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. त्यात काल लागलेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालातून एक चांगली बातमी समोर आली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या तुलनेत छत्तीसगडमध्ये महिला आमदारांची संख्या वाढली असल्याचे नव्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

छत्तीसगड विधानसभेत पहिल्यांदा तब्बल १८ महिला आमदार शपथ घेणार आहेत. येथील सरगुजा भागातील सर्वाधिक ६ महिला आमदार विजयी झाल्या आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत १३ महिला आमदार विधानसभेत पोहोचल्या होत्या. तर त्यानंतर पोटनिवडणुकीत ३ महिला आमदारांचा विजय झाला होता. यंदा एकाच झटक्यात भाजपच्या ८ आणि काँग्रेसच्या १० महिला आमदार शपथ घेतील. यंदा भाजपने १५ आणि काँग्रेसने १८ महिला उमेदवारांना तिकीट दिलं होतं.

छत्तीसगडमध्ये महिला आमदारांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या ९० जागांपैकी १९ महिला आमदार विजयी झाल्या आहेत. तेलंगणात ११९ पैकी (२०१८ – ६) १० आणि मध्य प्रदेशात २३० जागांपैकी (२०१८ – २१) २७ जागी महिला आमदार निवडून आल्या आहेत. हे प्रमाण राजस्थानमध्ये घटल्याचं दिसून येत आहे. विधानसभेच्या १९९ जागांपैकी (२०१८ – २४) २० महिला आमदार आहेत. टक्क्यांमध्ये विचार केला तर यंदाच्या विधानसभेत महिला आमदारांचं प्रमाण छत्तीसगडमध्ये २१% , मध्यप्रदेश १२%, राजस्थान १०% आणि तेलंगणात ८% इतके आहे.

भाजपच्या ८ महिला आमदार
भाजपच्या महिला आमदारांमध्ये भरतपूर-सोनहटहून रेणुका सिंह, भटगांवहून लक्ष्मी राजवाडे, प्रतापपूर शकुंतला सिंह पोर्ते, सामरीहून उद्धेश्वरी पैकरा, जशपूरहून रायमुनि भगत, पत्थलगावांतून गोमती साय, पंडरियाहून भावना बोहरा आणि कोंडागांवहून लता उसेंडी विजयी झाल्या आहेत.

काँग्रेसच्या १० महिला आमदार
लैलुंगाच्या आमदार विद्यावती सिदार, सारगंडहून उत्तरी जांगडे, सरायपालीहून चातुरीनंद, बिलाइगडहून कविता प्रान लहरे, सिहावाहून अंबिका मरकाम, संजारी बालोदहून संगीता सिन्हा, डौंडी लोहाराहून अनिला भेडिया, खैरागडहून यशोदा निलंबर वर्मा, डोंगरगढहून हर्षिता स्वामी बघेल आणि भानुप्रतापपूरहून सावित्री मनोज मंडावी विजयी झाल्या आहेत.

गेल्या निवडणुकांचा कल
छत्तीसगडमध्ये पहिली विधानसभा निवडणूक २००३ मध्ये झाली होती. यावेळी निवडणूक लढणाऱ्या महिलांची संख्या ६२ होती. २०१८ मध्ये ही संख्या वाढून ११५ पर्यंत पोहोचली. यंदा २०२३ मध्ये निवडणुकीच्या रिंगणात १५५ महिला उभ्या राहिल्या होत्या.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे