मुंबई
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले आणि विजयी ठरलेले सत्यजित तांबे यांचं वेगळेपण त्यांच्या कार्यातून दिसतं. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी एक विषय लावून धरला होता, विशेष म्हणजे त्यात यशही लाभले आहे.
आता योगासने खेळाडूंनाही शिवछत्रपती पुरस्कार तसेच राज्य शासनाच्या विविध सुविधा मिळणार आहे, यामागे सत्यजित तांबे यांचं मोठं श्रेय आहे. याबाबत ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली आहे. यासंदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश त्यांनी शेअर केला आहे. यावेळी त्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे व क्रिडा मंत्री संजयजी बनसोडे यांचे विशेष आभार मानले.
सत्यजीत तांबे यांचं ट्विट..
अखेर आपल्या मागणीला यश आले !
आता योगासने खेळाडूंनाही मिळणार शिवछत्रपती पुरस्कार तसेच राज्य शासनाच्या विविध सुविधा !
गेले ८ महिने मी सातत्याने या विषयी प्रयत्न करीत होतो, वारंवार विधानपरिषदेच्या सभागृहात तसेच मंत्रालयात यासाठी पाठपुरावा केला, राज्याचे योगासने असोसिएशनचे अध्यक्ष संजय मालपाणी यासाठी फार आग्रही होते, अखेर आज निर्णय झाला. विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे व क्रिडा मंत्री संजयजी बनसोडे यांचे विशेष आभार.