ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

वेल्स संसद व ब्रिटन संसदीय संस्थांना भेट; महाराष्ट्र विधिमंडळ प्रतिनिधींचा अभ्यासदौरा

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या (Maharashtra Legislative) सभापती व अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत युनायटेड किंगडममधील संसदीय व शैक्षणिक संस्थांच्या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात Commonwealth Parliamentary Association (CPA) मुख्यालय, लंडन तसेच University of Wales Trinity Saint David, लँपेटर (वेल्स) येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या दौऱ्यात सभापती राम शिंदे व महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत वेल्श विधानसभा व ब्रिटन संसदेत समारोपाची सत्रे होणार आहेत.

१९ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार) चा कार्यक्रम :
कार्डिफ येथे सकाळी महाराष्ट्र आमदार प्रतिनिधीमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर प्रतिनिधीमंडळाने वेल्स संसद Senedd येथे भेट दिली.
• वेल्स सरकारचे शाश्वत विकास प्रमुख Lloyd Harris यांच्यासोबत बैठक
• वेल्स संसद आंतरराष्ट्रीय संबंध अधिकारी Al Davies यांनी संसद भवनाच्या अभ्यासदौऱ्यात माहिती दिली
• फ्युचर जनरेशन कमिशनर Derek Walker यांच्यासोबत “Managing Change” विषयावर प्रतिनिधींनी संवाद साधला

२० फेब्रुवारी २०२६ (शुक्रवार) कार्यक्रम :

सकाळी कार्डिफहून लंडन येथे प्रयाण करून दुपारी वेस्टमिन्स्टर परिसरात यूके संसद भवन (Houses of Parliament) येथे दुपारी ३.०० ते ४.३० या वेळेत अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला.
• प्रा. Jeremy Smith (Dean, UWTSD) यांच्या मार्गदर्शनाखाली संसदीय कार्यपद्धतीची माहिती
• त्यानंतर वेस्टमिन्स्टर परिसरात संवाद व भेटीगाठी कार्यक्रम
• सायंकाळी National Liberal Club येथे आयोजित स्नेहभोजन व प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात सर्व सहभागी झाले
• CPA चे डेप्युटी सेक्रेटरी जनरल Jarvis Matiya यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

या अभ्यासदौऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम संसदीय पद्धतींचा अभ्यास, शैक्षणिक प्रशासन, संशोधन संसाधने, संस्थात्मक नेटवर्किंग आणि व्यावसायिक कौशल्यविकासाला चालना मिळेल, असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

महाराष्ट्र विधिमंडळ प्रतिनिधीमंडळाच्या या अभ्यासदौऱ्यात राम शिंदे, डॉ. नीलम गोऱ्हे, आदिती तटकरे, बाबासाहेब देशमुख, विश्वजीत कदम, नमिता मुंदडा, स्नेहा दुबे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, विक्रम पाचपुते, विक्रांत पाटील, सुमित वानखेडे, मनीषा कायंदे, निरंजन डावखरे, वरुण सरदेसाई, परिणय फुके, विक्रम काळे तसेच समन्वयक म्हणून चैतन्य मारपकवार सहभागी आहेत.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे