मुंबई

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३,७७८ कोटींची तरतूद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार

२०१४ नंतर एकाच वर्षात २० पट अधिक तरतूद

मुंबई : महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३,७७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

२०१४ नंतर रेल्वे विकासात मोठी वाढ

यापूर्वी २००९ ते २०१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी १,१८१ कोटी रुपये मिळायचे. मात्र, यंदा एकाच वर्षातील तरतूद तब्बल २० पट जास्त आहे.
• २०१४ ते २०२५ दरम्यान राज्यात दरवर्षी सरासरी १९१ किमी नवे रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले, तर यापूर्वी हे प्रमाण केवळ ५८ किमी प्रतिवर्ष इतके होते.
• २००९ ते २०१४ या कालावधीत एकाही मार्गाचे विद्युतीकरण झाले नव्हते. मात्र, २०१४ ते २०२५ या कालावधीत दरवर्षी सरासरी ३२६ किमी मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले.
• महाराष्ट्रातील एकूण ३,५८६ किमी रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.
• याच कालावधीत राज्यात २,१०५ किमी नवे रेल्वे मार्ग बांधण्यात आले, जे मलेशियाच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कइतके आहे.

१.५८ लाख कोटींचे ४७ रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर

महाराष्ट्रात १,५८,८६६ कोटी रुपयांचे ४७ रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पांतून ६,९८५ किमी मार्गाची बांधणी सुरू आहे.
• यामध्ये बुलेट ट्रेनसह ‘डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ चे चार महत्त्वाकांक्षी प्रकल्प समाविष्ट आहेत.
• १३२ अमृत रेल्वे स्थानकांची निर्मिती करण्यासाठी ५,५८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
• रेल्वे सुरक्षा प्रणालीसाठी ४,३३९ किमी मार्गावर ‘कवच’ प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. यातील ५७६ किमी अंतरासाठी यंत्रणा आधीच सुरू आहे.
• २०१४ नंतर राज्यभरात १,०६२ रेल्वे उड्डाण पुल आणि भुयारी मार्ग (आरएफओबी, आरयुबी) बांधण्यात आले आहेत.
• २३६ ठिकाणी लिफ्ट, ३०२ एस्कलेटर्स आणि ५६६ रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
• ११ जिल्ह्यांसाठी ११ वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र रेल्वे नकाशावर सशक्त राज्य

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. यामुळे—
✅ प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढल्या
✅ मालवाहतुकीस चालना मिळाली
✅ राज्याच्या आर्थिक प्रगतीस मदत झाली

या विकासामुळे महाराष्ट्र रेल्वेच्या नकाशावर अधिक सशक्त आणि सदृढ राज्य बनले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव