नवी दिल्ली: राज्यसभेत भाजपा खासदार डॉ. दिनेश यांनी पुरुषांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, खोट्या प्रकरणांमुळे होणारा अन्याय आणि पुरुषांवरील घरगुती हिंसाचार यासंदर्भात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी सर्व लिंगांसाठी समान कायदेशीर संरक्षणाची गरज असल्याचे अधोरेखित केले.
कोट्यवधी कुटुंबांची वेदना संसदेत मांडली
खासदार डॉ. दिनेश यांनी खोट्या आरोपांमुळे अनेक पुरुषांवर होत असलेल्या अन्यायाकडे संसद आणि सरकारचे लक्ष वेधले. पुरुषसुद्धा घरगुती हिंसाचाराचे बळी ठरू शकतात, मात्र त्यांच्यासाठी कुठलेही कायदेशीर संरक्षण उपलब्ध नाही.
सर्वोच्च न्यायालयाकडून PIL नाकारल्या जात आहेत
खासदार दिनेश यांनी पुरुषांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संघर्षाकडेही लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक असतानाही सर्वोच्च न्यायालय अशा प्रकरणांवरील जनहित याचिका (PIL) वारंवार फेटाळत आहे आणि यासाठी संसदेकडे जाण्यास सांगत आहे.
कायदेशीर सुधारणा आणि समान हक्कांची मागणी
डॉ. दिनेश यांनी संसदेत या विषयावर चर्चा करण्याची मागणी करत सर्वांसाठी समान संरक्षणाच्या दिशेने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. हे प्रकरण केवळ वैयक्तिक नव्हे, तर कोट्यवधी कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.
या मुद्द्यावर जनजागृती होण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी माध्यमांनी साथ द्यावी, अशी मागणी समर्थकांनी केली आहे.