महाराष्ट्र ताज्या बातम्या

नवीन प्रवेश प्रणालीमुळे मंत्रालय कर्मचाऱ्यांचे होताहेत हाल……!

बहुतांश जणांना बसला लेटमार्कचा फटाका!

मुंबई – राज्य सरकारने मंत्रालय प्रवेशासाठी नवीन एफआरएस (Face Recognition System) प्रणाली सोमवारपासून लागू केली. तथापि, या निर्णयापूर्वी शासनाने कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना देणे आणि या प्रणालीसंदर्भात योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे होते. परंतु, तसे न झाल्यामुळे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी, सोमवारी जवळपास १०० च्या वर कर्मचाऱ्यांना उशिरा हजेरीची नोंद (लेटमार्क) बसली.

मंत्रालय प्रवेशद्वारावर तणावाचे वातावरण

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महायुती सरकार स्थापन झाले. याआधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामान्य नागरिकांना थेट मंत्रालय प्रवेश दिला होता. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव नवीन एफआरएस प्रणाली लागू केली आहे. यामुळे मंत्रालयात आता मुक्त संचार शक्य नाही. मंत्रालयातील मागच्या मैदानाकडील प्रवेशद्वारकडून आत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या इतकी वाढली की, जवळपास परिस्थिती थोडी जरी इकडची तिकडे झाली असती तर सुरक्षा कर्मचाऱ्यांची अक्षरशः तरंबळाच उडाली असती. तरीही कर्मचाऱ्यांच्या गर्दीने चर्चगेट स्टेशन गाठले असते, असे काही उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले.

याच प्रणालीमुळे सोमवारी मंत्रालय प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ उडाला. एका मोठ्या मंत्र्यांचे ओएसडी (ऑफिसर ऑन SPECIAL DUTY) जे फेस रिडिंग प्रक्रिया पूर्ण करूनही मंत्रालयात प्रवेश करत होते, त्यांना अचानक मशीन बिघाड झाल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना आपले ओएसडी असल्याचे सांगितले, मात्र पोलिसांनी त्यांना सरळ “जा, पास काढा” असा सल्ला दिला. यामुळे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेशासाठी रांगेत उभे राहावे लागले आणि मंत्रालय प्रवेशद्वारावर पोलिसांशी शाब्दिक चकमकही उडाली.

अन्न व औषध प्रशासन मंत्री पुढाकार घेणार

मंत्रालयात अनेक ज्येष्ठ नागरिक भेटीसाठी येतात. त्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या किंवा औषधं आणण्यास परवानगी मिळावी का, याबाबत चर्चा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ पुढाकार घेणार आहेत. लवकरच ते संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत तसेच सुरक्षा विभागासोबत चर्चा करून काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात