ताज्या बातम्या महाराष्ट्र

नाशिकच्या महायुतीच्या जागेसाठी छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर, ओबीसी नेते म्हणून भुजबळांना संधी मिळणार ?

नाशिक- नाशिक लोकसभेच्या जागेवारुन महायुतीत तिढा आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे या ठिकाणाहून पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दोन दिवसांपूर्वी उमेदवारी मिळावी यासाठी हेमंत गोडसे यांनी ठाण्य़ात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर जोरदार शक्तिप्रदर्शनंही केलं. त्यानंतर नाशिकमध्ये भाजपाच्या देवयानी फरांदे यांनीही भाजपाही या मतदारसंघासाठी आग्रही असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. भाजपानंही या मतदारसंघावर दावा सांगितलेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महायुतीच्या चर्चेतही नाशिकवर राज ठाकरेंकडून दावा केल्याची माहिती आहे. यातच आता छगन भुजबळ या जागेवर लढतील अशी चर्चा सुरु झालीय.

चर्चा भुजबळांच्या टिझरची

नाशिकमध्ये राजकीय घडामोडींनी वेग पकडलेला असतानाच भुजबळांचा योद्धा नावाचं एक टिझर आज सकाळपासून व्हायरल झालंय. या टिझरमुळं भुजबळही या स्पर्घेत आहेत, अशी चर्चा सुरु झालीय. उद्या अजित पवारांसोबत नाशिक लोकसभा मतदारसंघाची चर्चा होणार आहे. त्यापूर्वी भुजबळ समर्थकांनी जारी केलेल्या या टिझरमुळं भुजबळ काय करणार याची उत्सुकता ताणली गेलेली आहे. यावर स्वता भुजबळ यांनी अदलाबदली होऊ शकते, असं सांगत संकेत दिल्याचं मानण्यात येतंय.

महायुतीचे उमेदवार म्हणून संधी

यापूर्वी चतीन निवडणुकांत समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांनी लोकसभा मतदारसंघातून निवडणुका लढवलेल्या आहेत. यात २००९ साली समीर भुजबळ यशस्वी झाले होते. आता भाजपा ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळांना नाशिकमधून संधी देण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या जागी नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.

मराठा संघटनांचा विरोध

छगन भुजबळआंना उमेदवारी दिल्यास मराठा संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. गुरुवारी मराठा समाजानंही याबाबत बैठक बोलावली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात, त्यांच्यावर सर्वाधिक टीका भुजबळांनी केली होती. भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक राजकीयदृष्ट्या गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात