ताज्या बातम्या महाराष्ट्र

आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील गैरकारभाराची SIT मार्फत चौकशी करा – अतुल लोंढे

X : @therajkaran

मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे (Dr Babasaheb Ambedkar Technological University) या विद्यापीठाच्या परीक्षा आणि निकालामध्ये (irregularities in examination and results) मोठ्या प्रमाणात अनिमियतता आणि गैरप्रकार झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. या गैरप्रकाराचा हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होणार आहे. विद्यापीठाचे ईआरपी पोर्टल ४ महिन्यांपासून बंद आहे, विद्यार्थी या ग्रेड सिस्टममधील गुण ओळखू शकत नाहीत, असे अनेक प्रकार विद्यापीठात होत असून विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. विद्यापीठातील या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Congress spokesperson Atul Londhe) यांनी केली आहे.

अतुल लोंढे म्हणाले की, लोणेरे येथील हे विद्यापीठ गैरकारभार व गैरव्यवस्थापनामुळेच सातत्याने चर्चेत असते. 100 पेक्षा जास्त दिवस उलटूनही अंतिम वर्ष आणि पुरवणी परीक्षेचे निकाल पूर्णपणे जाहीर केलेले नाहीत. यामुळे विद्यार्थीमध्ये चिंता वाढली असून नैराश्य पसरले आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. विद्यार्थी दिलेल्या गुणांबाबत असमाधानी आहेत आणि विद्यापीठाने ज्या पद्धतीने पेपर तपासणी प्रक्रिया केली आहे त्यात गैरप्रकार झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या नावाने लोणेरे येथे हे तंत्रज्ञान विद्यापीठ सुरु करण्यात आले आहे. परंतु गैरव्यवहाराने या विद्यापीठाच्या नावलौकिकाला काळिमा फासला जात आहे. राज्य सरकार तसेच महामहिम राज्यपाल यांनी या प्रकरणी लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा व विद्यापीठातील कारभार सुधारावा, असेही अतुल लोंढे म्हणाले.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात