ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात दंगली घडवण्याचे उध्दव ठाकरेंचे कारस्थान

भाजपाचे ज्येष्ठ नेते खा.नारायण राणे यांचा गौप्यस्फोट….

X : @NalawadeAnant

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुका (Assembly elections) डोळ्यासमोर ठेवून मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj) महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करत आहे. महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) राज्यात दंगली (Riots) घडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते खा. नारायण राणे (BJP MP Narayan Rane) यांनी सोमवारी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव घेत केला. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला.

भाजपा प्रदेश कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खा. राणे यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही जोरदार हल्ला चढवला. राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची छायाचित्रे जाणूनबुजून समाज माध्यमांवर प्रसारित करणा-या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही राज्य सरकारने तातडीनं कारवाई करावी, अशी आग्रही मागणीही खा.राणे यांनी केली.

खा. राणे म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी जाहीर माफी मागितली आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्यासाठी आणि त्याच ठिकाणी शिवरायांचा नवीन पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारतर्फे समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. असे असताना विकासाच्या मार्गावर अव्वल ठरत असलेल्या महाराष्ट्रात या ना त्या प्रकारे जातीय तणाव (communal tension) निर्माण व्हावा, रस्त्यावरचा संघर्ष निर्माण व्हावा अशी परिस्थिती निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, असा आरोप करत, मात्र सूज्ञ जनता हा मविआचा मनसुबा उधळून लावेल, असा विश्वासही खा.राणे यांनी व्यक्त केला.

मविआ च्या जोडे मारो आंदोलनाचा खरपूस समाचार घेताना खा. राणे यांनी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी २००४ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Swatantrya Veer Sawarkar) अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते, या घटनेची आठवण करून दिली. २००४ च्या आणि आजच्या जोडे मारो आंदोलनात जमीन आसमानाचा फरक असल्याचे सांगत खा. राणे म्हणाले की, यावेळी उद्धव ठाकरेंच्या शेजारी जोडे मारो आंदोलनात काँग्रेस नेते उभे होते. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींबाबत (Rahul Gandhi) मात्र हेच उध्दव ठाकरे चकार शब्द उच्चारत नाहीत आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे तर राज्यातील वातावरण पेटते रहावे यासाठीच प्रयत्न करत असल्याचं आरोपही खा. राणे यांनी केला. अनेक वर्षे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रीपदी असूनही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) शरद पवार यांनी काही केले नसल्याची खंतही खा. राणे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी माजी आ. राज पुरोहित, श्याम सावंत, प्रदेश प्रवक्ता ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. 

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात