मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत अर्बन नक्षली संघटना सहभागी झाल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सहभागी संघटनांची आणि त्यांच्यासोबतच्या प्रमुखांची यादी मागितली आहे.
पटोलेंनी पत्रात म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून समाजाच्या कल्याणासाठी काम करत आहेत. अशा संघटनांना नक्षलवादी म्हणणे चुकीचे आहे.” त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे जाहीर करण्याची मागणीही केली आहे.
पटोलेंच्या या मागणीमुळे भारत जोडो यात्रेबाबतच्या वादाला नवे वळण मिळाले आहे.