मुंबई – अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील सुनावणी पुढे सुरूच राहणार असून, पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. मात्र, अद्याप काही महत्त्वाची कागदपत्रे प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे आजची सुनावणी तहकूब करण्यात आली.
अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी याचिका मागे घेतली असली तरी, “आम्ही लढा सुरूच ठेवणार,” असे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले.
बदलापूर प्रकरणात याचिकाकर्ते अण्णा शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांना कोर्टाने सांगितले की, “तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल तो घ्या. आम्ही तुम्हाला बोलावलेले नाही. तुम्हाला यायचे असेल तर या, नाही तर यायची गरज नाही.”
तथापि, या प्रकरणातील सुनावणी सुरूच राहणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.