डोंबिवली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील (Former MNS MLA Raju Patil on Palava bridge) यांनी डोंबिवलीच्या पलावा पुलाच्या दर्जाहीन कामावरून हल्ला चढवत सरकारवर आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे.
राजू पाटील यांनी म्हटले की, ४ जुलै रोजी लोकार्पण झालेल्या पलावा पुलाला अवघ्या ३० दिवसांत खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. “पाणी अडवा, पाणी जिरवा” याचे हे सरकारकडून केलेले विचित्र प्रात्यक्षिक असल्याची टीका त्यांनी केली. याआधीही ‘शिंदे अँड सन्स’ (Shinde and Sons) कंपनीने डोंबिवलीकरांच्या (Dombivlikar) भावनांशी, पैशांशी आणि निकृष्ट कामाच्या माध्यमातून जीवाशी खेळ केल्याचे त्यांनी आरोप केले.
त्यांनी सांगितले की, डोंबिवलीच्या विकासाला (Development of Dombivli) लागलेले ‘ग्रहण’ कोणते आहे हे स्थानिकांपासून सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वांनाच माहीत आहे. “पलावा पूल म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ; गुणवत्तेच्या नावाने ढोल पिटले. करदात्यांचे हजारो कोटी रुपये खर्च झाले, पण कोणाचा खिसा गरम झाला आणि गुणवत्तेचा बळी कोणाने दिला, हे कोण शोधणार? या कामाचे ऑडिट होणार का? जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई होणार का?” असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
राजू पाटील यांनी पुढे म्हटले, “या प्रकरणात ‘त्यांच्या’ सत्तेत तुम्हीही २५-३० वर्ष भागीदार आहात. जर ‘त्यांच्या’ पापात भागीदार व्हायचे नसेल, तर या ‘चांदभाईंची’ नावे घेऊन बोला. नाहीतर हा सल्ला पलावा पुलाच्या खड्ड्यात टाका.”