महाराष्ट्र ताज्या बातम्या

Worli: वरळी मेट्रो स्टेशनवरील ‘नेहरू’ नाव वगळल्याने वाद — काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : वरळी मेट्रो स्टेशनवरून ‘नेहरू’ हे नाव वगळल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत ही कृती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, वरळी परिसरातील हे ठिकाण वर्षानुवर्षे ‘नेहरू सायन्स सेंटर’ म्हणूनच ओळखले जाते. अगदी @MumbaiMetro3 च्या अधिकृत ट्विटमध्येही ‘डिस्कव्हरी हब्स’ यादीत या ठिकाणाचे नाव ‘नेहरू सायन्स सेंटर’ असेच दाखवण्यात आले आहे.

“भाजपला ‘नेहरू’ या नावाची अॅलर्जी असल्यामुळेच त्यांनी मुद्दामहून ते नाव वगळून मेट्रो स्थानकाचे नाव केवळ ‘सायन्स सेंटर’ असे ठेवले आहे,” असा आरोप सावंत यांनी केला.

सावंत म्हणाले की, ही बाब अत्यंत आक्षेपार्ह असून भारताचे पहिले पंतप्रधान आणि जगप्रसिद्ध नेते भारत रत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीचा मोठा अपमान आहे.

“नेहरूंनी भारताला वैज्ञानिक दृष्टी, औद्योगिक प्रगती आणि आधुनिकतेचा पाया दिला. त्यांच्या कार्याचे अवमूल्यन करण्याचा प्रयत्न म्हणजे राष्ट्रनिर्मात्यांचा अवमान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सावंत यांनी पुढे म्हटले की, भाजप सरकारकडून अशा प्रकारच्या नावबदलांच्या घटना वारंवार घडत आहेत.

“दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी चे नाव बदलून प्राईम मिनिस्टर्स म्युझियम करण्यात आले. नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) चे नाव माय भारत करण्यात आले. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम चे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवण्यात आले,” असे ते म्हणाले.

“भाजप कितीही प्रयत्न करून नेहरूंचे नाव मिटवण्याचा प्रयत्न केला तरी ते प्रयत्न आभाळावर थुंकण्यासारखे ठरतील,” असा इशारा सावंत यांनी दिला.

काँग्रेसने स्पष्ट मागणी केली आहे की वरळी मेट्रो स्टेशनला पुन्हा ‘पंडित नेहरू सायन्स सेंटर’ असेच नाव देण्यात यावे.
सावंत यांनी म्हटले की, “भाजप सरकारचा हा संकुचित आणि सूडबुद्धीचा दृष्टिकोन केवळ इतिहास पुसण्याचे काम करत नाही, तर भारताच्या प्रतिष्ठेला आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेलाही धक्का पोहोचवत आहे.”

काँग्रेसने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत केंद्र आणि राज्य सरकारकडून त्वरित दुरुस्तीची मागणी केली आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात