महाराष्ट्र ताज्या बातम्या

Eknath Shinde : “आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरताय!” — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार टोला

मुंबई : “मुख्यमंत्री असताना तुम्ही घरात बसलात! फेसबुकवरून राज्य चालत नाही. जनता संकटात असताना रस्त्यावर उतरावं लागतं. आता शेतकऱ्यांच्या बांधावर फिरताय, पण कमरेवर हात ठेवून उभं राहू नका — आमच्यासारखे देणारे हात बना!”
अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता तीव्र हल्ला चढवला.

शिंदे ठाण्यात आयोजित महायुतीच्या सभेत बोलत होते. त्यांनी पुढे टोला लगावला —
“अडीच वर्षे मुख्यमंत्री राहून घरातच बसलात. राज्य संकटात असताना फेसबुक लाईव्हवर भाषणं देऊन काय उपयोग झाला? आम्ही कोल्हापूरचा पूर असो वा इर्शाळवाडीचं दु:ख — घटनास्थळी जाऊन निर्णय घेतले, निधी दिला, लोकांना दिलासा दिला. आम्ही काम करतो, फक्त टीका करत नाही.”

शिंदे यांनी भाजप–शिवसेना महायुतीच्या आत्मविश्वासपूर्ण तयारीचा उल्लेख करत म्हटलं —
“निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल! विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. ठाणे भगव्याचं किल्ला आहे, त्यामुळे गुलाल उधळण्यासाठी सज्ज व्हा!”

ते पुढे म्हणाले, “काही जण आम्हाला ‘भकास’ म्हणतात. पण आम्ही अडीच वर्षांत महाराष्ट्र पालथा घातला! मुख्यमंत्री असताना तुम्ही काय केलंत? आम्ही महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी काम केलं आणि जनतेचा विश्वास जिंकला.”

शिंदेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले, “हा पक्ष कोणाचा मालकी हक्क नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो काम करेल तोच पुढे जाईल. बाळासाहेबांनी सांगितलं — शिवसेनेतील सगळ्यात मोठं पद म्हणजे शिवसैनिक! आम्ही ते जपलंय आणि जपत राहू. आमचं सरकार काम करणाऱ्यांचं आहे, फक्त बोलणाऱ्यांचं नाही.”

सभेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजयबापू शिवतारे, शिवसेना सचिव राम रेपाळे, तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात