महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाडमध्ये शरण्या दवंडे मृत्यू प्रकरणी ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल करण्याची मागणी

न्याय मागणाऱ्या नागरिकांवर पोलीस ठाण्यासमोर लाठीहल्ला

महाड: महाड–गोठे रोडवरील सव गावाच्या हद्दीत रस्त्याने चालत असलेल्या शरण्या अक्षय दवंडे (वय ८ वर्षे) या चिमुरडीला भरधाव कारने धडक देऊन पळून जाणाऱ्या वाहनचालकावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मृत शरण्येच्या नातेवाईक रूपाली मनोज आंग्रे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक तसेच राज्याच्या गृहसचिवांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.

महाड तालुक्यातील कोंडीवते गावातील रहिवासी रूपाली आंग्रे (वय ४७) या सव गावाजवळ एसटी बसमधून उतरून रस्त्याने पायी चालत होत्या. त्यावेळी शिवम अक्षय दवंडे (वय ९) आणि शरण्या अक्षय दवंडे (वय ८) ही दोन्ही मुलेही रस्त्याने चालत होती. त्याचवेळी महाडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या MH-06-2294 क्रमांकाच्या स्विफ्ट कारने शरण्येला जोरदार धडक दिली. कारचालक फरहान अब्दुल कादिर ताजीर (रा. अप्परतुडील) याने शरण्येला गाडीखाली फरपटत नेले, ज्यामुळे तिला डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर संबंधित चालक घटनास्थळावरून फरार झाला.

जखमी शरण्येला तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महाड शहर पोलीस ठाण्यात गर्दी करून आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र जमाव शांत न झाल्याने पोलिसांनी लाठीहल्ला केल्याची माहिती आहे. या लाठीहल्ल्यात सव गावातील ४ ते ५ नागरिक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक 003/2026 नोंदवण्यात आली आहे. मात्र या एफआयआरमध्ये चुकीची कलमे लावण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत कलम 106(2) (हिट अँड रन) लावण्याऐवजी कलम 106(1) लावण्यात आले आहे. तसेच भारतीय न्यायसंहिता 2023 अंतर्गत कलम 281, 125(a) आणि मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत कलम 125(b), 134, 184 लावण्यात आले आहेत.

अपघातानंतर वाहन घेऊन पळ काढल्यामुळे हा प्रकार स्पष्टपणे हिट अँड रन स्वरूपाचा असल्याचे सांगत, आरोपी चालकावर BNS कलम 106(2) लावण्याची ठाम मागणी मृत शरण्येच्या नातेवाईक रूपाली आंग्रे यांनी केली आहे.

दरम्यान, न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या ग्रामस्थांवर लाठीहल्ला करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा सवाल महाड तालुक्यात उपस्थित केला जात असून या घटनेची तीव्र चर्चा सुरू आहे.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात