महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईसह एमएमआर क्षेत्रात दोन्ही ठाकरे बंधूंची शक्ती पणाला!

मुंबई – सध्या राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार सर्वच राजकीय पक्षांनी टोकाचा सुरू केला आहे. तो गेल्या १५ वर्षात कधीच बघितला गेला नाही. आता एमएमआर क्षेत्रापुरता बोलायचे झाले तरं ज्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्पच मुळी एखाद्या देशातील छोट्या राज्याच्या अर्थसंकल्पा एवढा आहे असे बोलले जाते, त्या मुंबई मनपाच्या तब्बल ८० हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती पक्षाच्या नेत्यांच्या डोळ्यात खुपत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही खास करून एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप या दोन पक्षांच्या नेत्यांना या ईर्षेने दिवसेंदिवस झपाटल्याचे चित्र एव्हाना स्पष्ट झाले आहे. परंतु भाजपच्या राज्य व केंद्रातील नेत्यांच्या बोलघेवड्या पणामुळे व आततायी निर्णयांमुळे आणि दुसरीकडे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अती महत्त्वाकांक्षेमुळे मुंबई मनपात यांचे सरकार सत्तारूढ होईल का…? तर अजिबात नाही… कारण या दोन्ही पक्षांचा डोळा हा खरेतर मुंबई मनपाच्या या अवाढव्य तिजोरीवर असल्याचे मुंबईकरांच्या नजरेतून एव्हाना लपून राहिलेले नाही हे वास्तव आहे.

आता असे असताना एकीकडे एकनाथ शिंदे व त्यांचे इतर नेते इतक्या इर्षेला पेटले आहेत की मुंबई मनपावर आमचाच भगवा फडकणार…. आता होतं कसं की वास्तवाचे भान हरवलेला माणूस हा खोल दरीत कोसळतोच….. त्याला कारणही तसेच आहे…. ते असं की शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी, ज्यांनी नंतर आपलीच शिवसेना खरी असा दावा सांगत मूळ शिवसेनेचे धनुष्यबाण ही निशाणीच फक्तं हिसकावली नाही तरं मूळ शिवसेना जिचे पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे हे आजही आहेत, त्यांच्या पक्षाच्या तब्बल ७० पेक्षा जास्त माजी नगरसेवकांना विविध प्रकारची प्रलोभन दाखवत तरं काही ठिकाणी अमाप ताकद’ देत त्यांना आपल्या शिवसेनेत खेचून घेतले. 

आता हे कोण होते तरं त्या त्या विभागातील जनतेला, येथील मूळ शिवसैनिकांना नकोसे झालेले असे ‘गब्बर’ झालेले नगरसेवक होते. ज्यांना आपण प्रस्थापित म्हणतो असे तीन-तीन, चार-चार टर्म त्या विभागातील शिवसैनिकांच्या व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अतोनात प्रेम जनतेच्या मतांवर कोणाच्याही मनात नसताना केवळ “मातोश्रीचा” आदेश म्हणून निवडून यायचे.

मात्र, आता परिस्थिती बदलली आहे हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात येत नाही. कारण या निवडणुकीत “मराठी” मुद्द्यावर एकत्र आलेले दोन्ही ठाकरे बंधू यांनी भक्कम अशी युती केलेली आहे. आता ही फक्तं मुंबईपुरतीच नसून सर्वच २९ मनपात ही युती झालेली आहे. त्यामुळे आजपर्यंत जे जनतेच्या व शिवसैनिकांच्या मनात होते, की दोन्ही ठाकरे एकत्र यावेत, ते प्रत्यक्षात आल्याने तेही सुखावले आहेत. दोन्ही भावांनी समंजस भूमिका घेत जागावाटपही करत निवडणुकीला एकत्र सामोरे जात आहे. 

तरं दुसरीकडे मुंबईसह एमएमआर क्षेत्रात मुजोर जैन, गुजराती, मारवाडी या समाजाची दिवसेंदिवस छोटे उद्योग ज्यात कालपर्यंत मुस्लिम अल्पसंख्यांक, उत्तर भारतीय यांची मक्तेदारी होती, त्यात सुरुवातीला चंचुप्रवेश करत ते त्यांनी या समाजाच्या हातून हिसकावून घेतल्याने या दोन्ही समाजात भाजपविरोधात एक मोठा असंतोष धुमसत आहे. आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भाजपसोबत असल्याने साहजिकच शिंदे हेही अप्रत्यक्षपणे या दोन्ही समाजाच्या रडारवर आलेले आहेत… याचा फार मोठा फटका या दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता खुद्द राज्याच्या गुप्तचर यंत्रणांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अगोदरच निदर्शनास आणून दिल्याने प्रदेश भाजपच्या नेत्यांनी याचा मोठा धसका घेतला आहे. पण ते तसे दाखवत नाहीत. 

अशात मुंबईच्या एका प्रचार सभेत बोलताना भाजपच्या दक्षिणेतल्या एका नेत्याने मुंबई हे फक्तं एक शहर नाव नसून ते एक आंतरराष्ट्रीय उलाढालीचे केंद्र असल्याने त्याला “बॉम्बे” म्हणणेच योग्य ठरेल असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुंबईसह महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनतेच्या मनात प्रचंड असंतोष धुमसत आहे.

त्यामुळेच दोन्ही ठाकरे बंधूच्या युतीचा हा फटका फक्तं मुंबईपुरताच राहणार नसून ते एमएमआर क्षेत्रातील मुंबईच्या तुलनेने छोट्या असलेल्या परंतु तितक्याच महत्वाच्या मिरा भाईंदर, वसई-विरार, ठाणे, कल्याण- डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई आदी मनपाच्या निवडणुकांतही बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.  दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीला मुंबई सोडाच पण वर उल्लेख केलेल्या मनपातही बऱ्यापैकी यश मिळेल असे चित्र आज निर्माण झाली आहे. म्हणूनच सध्यातरी या मनपात भाजप व शिंदे यांच्या सेनेला यावेळी एक जबर फटका बसणारच, असेही आताच छातीठोकपणे सांगितले जात आहे. तूर्तास इतकेच!

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात