महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड–दापोली राज्य मार्गावर व्हॅगनार–रिक्षा अपघात; ५ जखमी

महाड : महाड–दापोली राज्य मार्गावर शिरगाव गावच्या हद्दीत अवघड वळणावर व्हॅगनार कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना शिरगाव हद्दीतील अवघड वळणावर घडली. MH-06-AZ-8240 क्रमांकाची व्हॅगनार कार दापोलीकडून महाडकडे येत होती, तर MH-12-SK-4998 क्रमांकाची रिक्षा महाडकडून आंबिवलीकडे जात असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली.

या अपघातात रिक्षातून प्रवास करणारे मनीष सचिन वाजे (रा. आंबिवली, ता. महाड) आणि रुचिता गायकर (रा. आंबिवली) हे दोघे जखमी झाले. तर व्हॅगनार कारमधील अमोल रमेश पवार (रा. महाड), रमेश बाबू पवार (रा. महाड) आणि नागेंद्र नागदेव प्रसाद (रा. करंजखोल, महाड) असे तिघे जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महाड शहर पोलीस स्टेशन या घटनेचा अधिक तपास करीत आहे.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात