महाड – स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी आज ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभही करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पक्षप्रमुख अमित ठाकरे तसेच पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी राज ठाकरे यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर गडावरून खाली येऊन गडाच्या पायथ्याशी आयोजित कार्यक्रमात त्यांनी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची अधिकृत सुरुवात केली.
राज ठाकरे यांनी स्वतः किल्ले रायगड येथून सदस्य नोंदणीचा फॉर्म भरत या अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी राज्यभरातून आलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
दरम्यान, आगामी १९ मार्च रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर होणाऱ्या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले. “गुढी पाडव्याला शिवतीर्थावर वाजतगाजत जल्लोषात या आणि जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा,” असे आवाहन त्यांनी केले.end


Zandra Trogdon
March 9, 2026Hey! I’m at work surfing around your blog from my new iphone 4! Just wanted to say I love reading your blog and look forward to all your posts! Keep up the great work!
online betting with upi
March 9, 2026I’d must test with you here. Which isn’t one thing I often do! I get pleasure from studying a put up that can make folks think. Additionally, thanks for allowing me to remark!
sfokcer topsde
March 9, 2026Hey there! This is my first comment here so I just wanted to give a quick shout out and say I genuinely enjoy reading your blog posts. Can you recommend any other blogs/websites/forums that deal with the same subjects? Thanks!