महाराष्ट्र ताज्या बातम्या

८६ हजार शाळांच्या पोषण आहार योजनेत गैरव्यवहार? विधानसभेत गदारोळ; एसआयटी चौकशीची मागणी

Education Minister Dadaji Bhuse addressing the Maharashtra Assembly amid uproar over alleged irregularities in the mid-day meal scheme across 86,000 aided schools.

मुंबई : राज्यातील तब्बल ८६ हजार अनुदानित शाळांमधील पोषण आहार योजनेत गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. संतप्त विरोधी सदस्यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

या मुद्द्यावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उत्तर देताना, “अनियमितता झाल्याचे आढळल्यास सचिव पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल,” अशी घोषणा केली.

ही लक्षवेधी सूचना आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी मांडली होती. त्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत केंद्र सरकार १८०० कोटी रुपये खर्च करते, मात्र निविदा प्रक्रियेनंतर पुरवठा करताना मूळ अटी व तपशीलात बदल करण्यात आले.

“महिला बचत गटांवर अन्याय करून ठराविक लोकांनाच कंत्राटे दिली जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला आणि एसआयटी चौकशीची मागणी केली.

या मागणीला काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य डॉ. नितीन राऊत यांनी जोरदार पाठिंबा दिला.

“विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असताना सरकार कोणाला पाठीशी घालत आहे? संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे आणि संपूर्ण चौकशी एसआयटीमार्फत करावी,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उत्तर देताना मंत्री भुसे यांनी सांगितले की, “संबंधित देयके अद्याप अदा केलेली नाहीत. एका महिन्यात चौकशी पूर्ण करण्यात येईल.”

मात्र, या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. “हा मुद्दा एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, हा राज्यव्यापी घोटाळा आहे,” असे स्पष्ट करत अनेक सदस्यांनी उभे राहून सरकारवर दबाव वाढवला.

“महिला बचत गटांचे काम काढून दिलेले कंत्राटदार सरकारचे जावई आहेत का?” असा तीव्र सवाल कैलास पाटील यांनी केला.

अखेर, सचिव पातळीवर चौकशी करून कारवाई करण्यात येईल, या आश्वासनानंतर गदारोळ शांत झाला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

1 Comment

  1. Robert Deschamp

    March 17, 2026

    Some genuinely nice and useful info on this website, besides I conceive the design and style has got wonderful features.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात