महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना दिलासा; अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis chairs a meeting with ministers and officials to review losses faced by Konkan mango and cashew farmers.

मुंबई  – कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे.

यंदा आंबा व काजू पिकावर आलेला मोहोळ मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने कोकणातील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवनात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

ते म्हणाले की, उपलब्ध माहितीच्या आधारे नुकसानीची तीव्रता लक्षात येत असून यापूर्वी अशा परिस्थितीत दिलेल्या मदतीचा विचार करून यावेळीही सर्व बाबींचा सांगोपांग आढावा घेऊन मदत जाहीर केली जाईल. यासाठी उपमुख्यमंत्री, कृषी व फलोत्पादन विभाग तसेच कोकणातील लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेतले जाईल.

या बैठकीला उपमुख्यमंत्री Sunetra Pawar, माजी केंद्रीय मंत्री   Narayan Rane, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, बंदरे मंत्री नितेश राणे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी नुकसानीबाबत सादरीकरण केले. कोकणातील लोकप्रतिनिधींनीही शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती देत तातडीने मदतीची मागणी केली.

दरम्यान, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

या बैठकीनंतर कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना लवकरच आर्थिक मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

1 Comment

  1. Dianne Schroepfer

    March 17, 2026

    You actually make it seem so easy with your presentation but I find this topic to be really something which I think I would never understand. It seems too complicated and extremely broad for me. I’m looking forward for your next post, I’ll try to get the hang of it!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात