महाड : महाड नगरपरिषदेच्या लाडवली येथील कचरा डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिक त्रस्त झाल्याने अखेर ग्रामस्थांनी नगरपरिषदेवर धडक देत नगराध्यक्ष सुनील कविस्कर आणि मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे थेट जाब विचारला. येत्या आठ दिवसांत डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
महाड शहरातून दररोज गोळा होणारा मोठ्या प्रमाणातील कचरा सुमारे सहा किलोमीटर अंतरावरील लाडवली येथील डम्पिंग ग्राउंडवर नेण्यात येतो. नगरपरिषदेच्या मते, येथे कचऱ्याचे वर्गीकरण व शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. मात्र प्रत्यक्षात या कचऱ्यामुळे वाढवली, गुंडाळे, देऊळकोंड आणि परिसरातील सुमारे २१ वाड्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.

या डम्पिंग ग्राउंडमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आजारपण वाढत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. तसेच महिलांमध्ये व वृद्धांमध्ये श्वसन व इतर आरोग्यविषयक तक्रारी वाढल्याचेही समोर आले.

ग्रामस्थांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, या डम्पिंग ग्राउंडमुळे गोडाळे परिसरातील नदी प्रदूषित झाली असून पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. परिणामी जनावरांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील विहिरीही दूषित झाल्याचा आरोप करण्यात आला.
यावर मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी फवारणीसारख्या उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. मात्र ग्रामस्थांनी हे उपाय अपुरे असल्याचे सांगत “फवारणी नको, डम्पिंग ग्राउंडच बंद करा” अशी ठाम भूमिका घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या कक्षात जाऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

नगराध्यक्ष कविस्कर यांनी तातडीने दुर्गंधी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असले, तरी ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या आठ दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल.


vorbelutr ioperbir
April 17, 2026Hi, i read your blog from time to time and i own a similar one and i was just curious if you get a lot of spam remarks? If so how do you reduce it, any plugin or anything you can recommend? I get so much lately it’s driving me insane so any support is very much appreciated.
sfokcertopsde
April 17, 2026I’m extremely inspired along with your writing skills as well as with the format for your blog. Is that this a paid topic or did you customize it your self? Either way stay up the nice quality writing, it is uncommon to peer a nice weblog like this one today..