मुंबई : वृद्ध कलावंतांसाठी असलेल्या पेन्शन योजनेत दशावतार कलावंतांचाही समावेश केला जाणार आहे. तसेच कलापथक प्रमुखांना मिळणारे अनुदान दुप्पट करण्यात येणार असून त्यातील निम्मी रक्कम थेट कलावंतांना मिळेल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत केली.
या संदर्भातील शासन निर्णय पुढील १५ दिवसांत जारी करण्यात येईल. तसेच दशावतार कलावंतांना ओळखपत्रे देण्याची तरतूदही त्यामध्ये केली जाईल, असे शेलार यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आमदार निलेश राणे यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना मांडली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कला ही प्राचीन लोककला असून कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, हजारो दशावतार कलावंतांसाठी एक वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही, असा मुद्दा राणे यांनी उपस्थित केला.
ओळखपत्र नसल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या दशावतार कलावंतांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन कलावंतांचाही हा विषय असल्याचे राणे यांनी सांगितले.
यावर उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे मान्य केले. या प्रकरणात प्रशासकीय पातळीवर दिरंगाई झाल्याचेही त्यांनी सांगितले. या दिरंगाईची सचिव स्तरावर चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोकणातील दशावतारासह पाच लोककलांना आधार देण्यासाठी अनुदान दुप्पट करण्यात येणार असून त्यासाठी चार कोटी चाळीस लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल, अशी घोषणाही शेलार यांनी विधानसभेत केली.


xnxx4.cc
July 9, 2026Greetings! Very helpful advice within this post!
It is thee little changes whijch will mazke thhe gretest changes.
Thhanks a lot foor sharing! xnxx