महाराष्ट्र ताज्या बातम्या

जालन्यात बनावट तूप निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर FDAची कारवाई; परवाना कायमचा रद्द करणार : नरहरी झिरवाळ

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ विधानसभेत जालन्यातील बनावट तूप कारखान्यावर FDA कारवाईबाबत उत्तर देताना

मुंबई : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे कथित बनावट तूप निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित आस्थापनेचा परवाना कायमचा रद्द करण्यात येईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.

या प्रकरणी सदस्य प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री झिरवाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तीर्थपुरी येथील मे. मुंदडा इंडस्ट्रीज या आस्थापनेवर छापा टाकला. तपासणीदरम्यान तुपामध्ये खाद्यतेल आणि तुपाचा फ्लेवर असलेले इसेन्स मिसळून बनावट तूप तयार करण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले.

या कारवाईदरम्यान एकूण आठ अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. पॅकबंद स्वरूपातील १,१२१.८ लिटर तूप, खुल्या स्वरूपातील ६६३.८ लिटर तूप आणि ११८ लिटर रिफाइंड सोयाबीन तेल असा एकूण १३.०४ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

सर्व नमुने अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि संबंधित नियमांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींमुळे संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला असून आस्थापना सील करण्यात आली आहे. पुढील प्रक्रियेनंतर परवाना कायमचा रद्द करण्यात येईल, असेही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात