महाराष्ट्र अन्य बातम्या

अवकाळी पावसाने महाडला झोडपले

By Milind Mane

Twitter : @milindmane70

महाड: संपूर्ण महाडला बुधवारी वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने झोडपून काढले. भात कापणी सुरू असल्याने कापलेले भात पाण्यामध्ये भिजले आहेत. या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे बुधवारी अचानक संपूर्ण महाड परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे संपूर्ण परिसरातील जणजीवन विस्कळीत झाले. तयार झालेल्या भात शेतीची कापणी सुरू आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून भाऱ्यांची शेतातच उडवी रचली आहेत. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणी तुंबून राहिले आणि कापणी केलेल्या भात पिकावर पाणी फिरले. रचून ठेवलेले भारे देखील भिजल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे भात शेती देखील चांगली आली होती.

महाड शहर व तालुक्यात मात्र या अवकाळी पावसामुळे तोंडाशी आलेला घास निघून जातो की काय अशी चिंता शेतकऱ्याला वाटू लागली आहे. या पावसामुळे भात पीक भिजल्याने या पिकाचे नुकसान होणार आहे.

ज्या शेतकऱ्यांचे दिनांक 08/11/2023 च्या पावसामुळे भात पिकाचे काढणीपश्चात नुकसान झाले असेल, अशा भात पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी ज्या सर्वे नंबर मधील भात पिकाचे नुकसान झाले आहे, त्या सर्वे नंबरची नुकसानीची तक्रार कृषि विमा कंपनीला देणे किंवा चोलामंडलम एम एस इन्शुरन्स कंपनीच्या टोल फ्री क्रमांक 18002089200 वर तक्रार 72 तासांच्या आत देणे अनिवार्य राहील, असे कृषी विभागाने कळवले आहे. याबाबत चोलामंडलम पिक विमा कार्यालय महाड (नवेनगर) धारिया – मो. नं. 7709762007 तर अधिक माहितीसाठी संपर्क-विठ्ठल पवार तालुका विमा प्रतिनिधी -8793400835 यांच्याशी संपर्क साधावा असे असवहान करण्यात आले आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात