ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना नेते शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा करणार!

Twitter : @milindmane70

मुंबई

राज्यातील उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण या भागात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची (crop loss due to unseasoned rain) पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांच्यासह विनायक राऊत (MP Vinayak Raut) व अन्य नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 29 नोव्हेंबर पासून पाहणी करणार आहेत.

राज्यातील उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), मराठवाडा (Marathwada), विदर्भ (Vidarbha) व कोकणातील (Konkan) वेगवेगळ्या भागातील शेतकरी व बागायतदार यांना मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसाचा व गारपिटीचा फटका बसून कांदा, द्राक्ष, मोसंबी, पपई, डाळिंब, टोमॅटो, कापूस, तूर, ज्वारी, हरभरा, गहू व भात यासारख्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळण्यास विलंब होत आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यासाठी व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena) गटाकडून पक्षप्रमुखांच्या आदेशाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश शिवसेना नेत्यांना देण्यात आले आहेत.

शिवसेना नेते व पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत हे नाशिक, इगतपुरी, त्रंबकेश्वर, डहाणू व पालघर या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यांच्या समवेत शिवसेना उपनेते व शेतकरी सेनेचे अध्यक्ष नितीन बानगुडे – पाटील, नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे छत्रपती संभाजी नगर, जालना, बुलढाणा या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यांच्या समवेत शिवसेना उपनेते व शेतकरी सेनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण वडले तसेच मराठवाडा शेतकरी सेनेचे अध्यक्ष वसिम देशमुख इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात